
सोनुनं आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉडेलिंगचा रस्ता निवडला होता. तिनं जो रस्ता निवडला होता तो तिला लवकरच यशाकडे घेऊन गेला होता.
मुंबई - बॉलीवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत त्यांना त्यांच्या करिअरमध्ये काही व्यक्तींकडून अप्रत्यक्षरित्या मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागल्याचे दिसून आले आहे. यात काहींनी थेटपणे त्या व्यक्तींची नावे घेतली आहेत. 1985 मध्ये मिस इंडियाचा किताब आपल्या नावावर करणारी अभिनेत्री सोनु वालियाचा आज जन्मदिवस. त्यानिमित्तानं तिनं एका मुलाखतीतून केलेला खुलासा धक्कादायक आहे.
19 फेब्रुवारी 1964 मध्ये एका पंजाबी कुटूंबात सोनुचा जन्म झाला. सोनुनं खून भरी मांग चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ती त्यावेळी बोल्ड अॅक्ट्रेसच्या लिस्टमध्येही सहभागी होती. 1988 मध्ये बॉलीवूडमध्ये आलेल्या सोनुची ओळख एक बोल्ड अभिनेत्री अशी होती. ती तिच्या वेगवेगळ्या बोल्ड सीनसाठी प्रसिध्द होती.
सोनुनं आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉडेलिंगचा रस्ता निवडला होता. तिनं जो रस्ता निवडला होता तो तिला लवकरच यशाकडे घेऊन गेला होता. मॉ़डेलिंगमध्ये ती यशस्वी होत गेली. त्यामुळे तिला मिस इंडियाच्या स्पर्धेत भाग घेता आला. 1985 मध्ये मिस इंडियाचा किताब तिनं पटकावला. त्यावेळी सर्वांचे लक्ष तिच्याकडे गेले होते. त्यानंतर बॉलीवूडचा मार्ग तिच्यासाठी खुला झाला. 1988 मध्ये सोनुनं खून भरी मांग या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यात रेखानं मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी तिला सहाय्यक अभिनेत्रीसाठीचा अॅवॉर्डही मिळाला होता.
1988 मध्ये चित्रपटांमधून ओळख तयार झालेल्या सोनुनं अनेक बोल्ड सीन द्यायला सुरुवात केली होती. अशाच एका बोल्ड सीनमुळे ती प्रसिध्द झाली होती. त्यावरुन त्यावेळी मोठा गोंधळ झाला होता. एका मुलाखतीमध्ये तिनं सांगितले होते की, मला माझ्या उंचीच्या कारणामुळे कुठल्या चित्रपटांमध्ये काम मिळत नाही. बॉलीवूडमधून जाण्याचे कारण तिला विचारल्यानंतर तिनं तीन खान कलाकारांमुळे मला काम मिळाले नसल्याचे सांगितले होते. सोनुची उंची ही 5 फुट आणि 8 इंच एवढी होती. तिन्ही खान अभिनेत्यांपेक्षा ती जास्त होती.
क्या बात है मेनन साब, दादासाहेब फाळके पुरस्कार आपके नाम
ज्येष्ठ गीतकाराच्या मदतीला नेहा धावली; 5 लाखांची केली मदत
दिल आशना है, खेल, स्वर्ग जैसा घर, आरक्षण, अपना देश पराए लोग, तुफान, तहलका सारख्या चित्रपटांमध्ये तिनं काम केलं होतं. मात्र या चित्रपटांना फारसे यश काही मिळाले नाही. त्यानंतर तिनं बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती.