धक्कादायक! सनी लिओनीचा भाऊ तिचे फोटो विकून मिळवायचा पैसे

वृत्तसंस्था
रविवार, 21 जुलै 2019

लहानपणी शाळेत सहन करावी लागलेली अवहेलना असो किंवा तरुणपणी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये केलेलं काम असो, सनीने कधीच कोणत्या गोष्टी लपवल्या नाहीत. सनी स्वखुशीने पॉर्न सिनेमांमध्ये काम करायची. तिच्यावर पैशांचा पाऊस तर पडत होताच, शिवाय तिचा भाऊही आपल्या पॉकेटमनीचा खर्च सनीमार्फत वसुल करायचा. होय, हे खरे आहे. 

मुंबई : पॉर्न इंडस्ट्रिमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सनी लिओनी हिचा भावाने एक धक्कादायक खुलासा केला असून, आपला खर्च भागविण्यासाठी तो सनीने सही केलेले तिचे पोस्टर्स विकायचा हे सांगितले आहे.

लहानपणी शाळेत सहन करावी लागलेली अवहेलना असो किंवा तरुणपणी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये केलेलं काम असो, सनीने कधीच कोणत्या गोष्टी लपवल्या नाहीत. सनी स्वखुशीने पॉर्न सिनेमांमध्ये काम करायची. तिच्यावर पैशांचा पाऊस तर पडत होताच, शिवाय तिचा भाऊही आपल्या पॉकेटमनीचा खर्च सनीमार्फत वसुल करायचा. होय, हे खरे आहे. सनी आणि तिचा भाऊ संदीप वोहरा यांच्यात फार चांगले नाते आहे. सनीने तिचे नावही भावाच्या नावावरूनच चोरले आहे. संदीपला घरात सारे सनी या नावाने हाक मारतात. जेव्हा तिने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा तिने सनी लिओनी हे नाव वापरायला सुरुवात केली.

याबाबत संदीप वोहराने 'मोस्टली सनी' या सिनेमात खुलासा केला आहे. संदीप म्हणाला की, त्याने सनीच्या ऑटोग्राफच्या मदतीने खूप पैसा कमावला. जेव्हा तो हॉस्टेलमध्ये राहायचा तेव्हा तो सनीने ऑटोग्राफ केलेला पोस्टर भिंतीवर चिकटवायचा. जेव्हाही कधी सनीचा चाहता संदीपच्या खोलीत यायचा तेव्हा तो पोस्टर विकत घ्यायचा.
मनाजोगते पैसे मिळाल्यावर संदीप ते पोस्टर द्यायचा. एक पोस्टर गेल्यानंतर संदीप दुसरे पोस्टर लगेच भिंतीवर लावायचा. संदीपला आजही या गोष्टीवर फार हसू येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress sunny leone brother sold her photographs for money