केरळीयन आंटीचा लूक पाहिलायं? फिदा व्हाल

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 19 February 2021

जगभरात सनीचा मोठा चाहतावर्ग आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात.

मुंबई - आपल्या वेगवेगळ्या लूकमुळे कायम चर्चेत असणा-या सनीचा आता एक वेगळं फोटोशुट समोर आलं आहे. ती नेहमीच हटके फोटोशुट करुन चाहत्यांना इंप्रेस करत असते. दोन दिवसांपूर्वी हाय हिल्स घालून ती फोटोशुट करायला गेली आणि पाण्यात पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अर्थात तो तिनं जाणीवपूर्वकच शुट केला होता. आताही सनीनचा केरळीयन लूक व्हायरल झाला आहे. त्याला चाहत्यांकडून मिळणारा प्रतिसाद मोठा आहे.

बॉलीवूडमध्ये सनीनं तिचं एक खास स्थान निर्माण केलं आहे. तिनं आतापर्यत वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात काम केलं आहे. जगभरात सनीचा मोठा चाहतावर्ग आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. त्यामुळे सनीच्या फॅन्स फॉलोअर्सची संख्या वाढली आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चर्चेत आले आहेत. सध्या तिच्याकडे कुठले चित्रपट नसले तरीही ती नेहमीच फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांच्या हिट लिस्टमध्ये असणारी सेलिब्रेटी आहे. असे म्हणता येईल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सध्या सनी केरळमध्ये असून तिथे तिनं फोटोशुट केलं आहे. तिची वेशभुषा पाहिल्यास ती पूर्णपणे केरळच्या कल्चरमध्ये सामावल्याचे दिसत आहे. तिचा तो लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे.

May be an image of 1 person and standing

सनीचा साऊथ इंडिय़न लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीचा आहे. त्यातील एका फोटोमध्ये सनी होडीमध्ये बसली आहे. तिनं पिंक कलरचा ब्लाऊज परिधान केला आहे. पिंक कलरची बिंदी, त्याच रंगाच्या बांगड्याही लक्ष वेधून घेत आहे.

May be a closeup of one or more people, jewelry and outdoors

सनीचा हा लूक एकदम सॉलिड आहे. तो चाहत्यांना आवडला आहे. तिच्या या फोटोंना कॅप्शन देताना तिनं लिहिले आहे की. केरळ मला प्रचंड आवडले आहे. त्याच्या प्रेमातच मी पडले आहे. येथील निसर्ग खूपच छान असल्याचे तिनं सांगितले आहे.

May be an image of 1 person and standing

दोन दिवसांपूर्वी सनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात तिनं हाय हिल्स घातले होते. आणि ती फोटोशुट करत होती. अशावेळी तिचा तोल गेल्यानं ती स्विमिंग पूलमध्ये पडली. त्या व्हिडिओला तिच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress sunny Leone shares her photo from Kerala actress looking beautiful in pink saree and bindi