
सनीनं सोशल मीडियावर शेयर केलेल्या त्या फोटोंना लाखोच्या संख्येनं लाईक्स मिळाले आहेत.त्यावर तेवढ्याच कमेंटही आहेत.
मुंबई - सनी लिओनी हे नाव कशासाठी प्रसिध्द आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. इंग्रजी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ती कधी बॉलिवूडमध्ये येईल असे कुणाला वाटले नव्हते. गेल्या काही वर्षांपासून तिनं बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख तयार केली आहे. आयटम गर्ल म्हणूनही सनी लोकप्रिय झाली आहे. आगामी काळातही सनीला मोठ्या प्रमाणात बॉलीवूडमधून चित्रपट मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या आयुष्यावर आधारित एक वेबसीरिजही प्रदर्शित झाली होती. वेगवेगळ्या सामाजिक कामांमध्येही सनीचा सहभाग दिसून येतो.
सोशल मीडियावर सनी नेहमीच चर्चेत राहणारा विषय आहे. सनी म्हणजे काही हॉट विषय असणार हे तिच्या चाहत्यांना माहिती आहे. त्यासाठी ती ओळखली जाते. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. तिच्या पोस्टला मिळणारे लाईक्स आणि कमेंटस यावरुन तिची लोकप्रियला लक्षात येईल. सनी नेहमी तिचे काही फोटो आणि व्हिडिओज शेयर करत असते. सध्या तिचं एक फोटोशुट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यात ती एका पूलमध्ये एंजॉय करताना दिसली आहे.
सनीनं सोशल मीडियावर शेयर केलेल्या त्या फोटोंना लाखोच्या संख्येनं लाईक्स मिळाले आहेत.त्यावर तेवढ्याच कमेंटही आहेत. अनेकांनी सनीची स्तूती केली आहे. केवळ भारतच नाही तर जगभरातून सनीचा चाहतावर्ग असल्यानं तिच्या प्रत्येक फोटोला मिळणा-या कमेंट आणि लाईक्स यांची संख्या लाखातच असते. केवळ फोटो नाही तर तिच्या व्हिडिओलाही तितकाच प्रतिसाद मिळतो.
बॉलीवूडच्या एखाद्या मोठ्या कलाकाराच्या वाट्याला जेवढे लाईक्स आणि कमेंटस येतात कदाचित त्यापेक्षा अधिक सनीच्या फोटो, व्हिडिओला मिळत असल्याचे दिसून आले आहे.
सनीनं जिस्म 2 मधून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले होते. त्यावेळी सनीनं दिलेल्या बोल्च सीनमुळे ती वादाच्या भोव-यात सापडली होती. यामुळे तिच्यावर टीकाही झाली होती. सनीसारख्या अभिनेत्रीकडुन आणखी कसली अपेक्षा करणार अशा आशयाच्या पोस्ट त्यावेळी व्हायरल झाल्या होत्या. आता तिच सनी लिओनी सर्वांच्या आवडीची अभिनेत्री म्हणून ट्रेंडिंगचा विषय असते.
सनीनं आता स्वतच्या टँलेटवर बॉलीवूडमध्ये जागा मिळवली आहे. त्यानंतर तिनं अमाप लोकप्रियता मिळवली. सनी फिटनेसलाही महत्व देते. त्याचेही व्हिडिओ ती शेयर करत असते. त्यालाही तिच्या चाहत्यांची पसंती मिळते. ती वर्कआऊट करायला विसरत नाही. त्यामुळेच ती सर्वांच्या आवडीचा आणि आकर्षणाचा विषय बनली आहे. ती अनेकांचे प्रेरणास्थानही आहे.
सनीनं 2011 मध्ये डॅनियल वेबरशी लग्न केले. तिला 3 मुले आहेत. सनीनं महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील एका मुलीला दत्तक घेतले होते. तिचे नाव तिनं निशा कौर असे ठेवले आहे. यानंतर तिनं सेरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. त्यांची नावे अशर सिंह आणि नोआ सिंह वेबर असे आहे.