सुष्मिता सेनच्या घरी आली नवरी!; पाहा लग्नाचे फोटो

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जून 2019

सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. टिव्ही अभिनेत्री चारु असोपा सोबत राजीव याचे सूत जुळले. हे जोडपं डेस्टिनेशन वेडींग करणार असल्याचे म्हटले जात होते. पण राजीवने अचानक काही फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले. 

सध्या बॉलिवूडमध्ये लग्न हा विषय चर्चेत आहे. कारण बॉलिवूडमधील अनेक जोडप्यांची लग्न झालीत, काहींची लग्नगाठ ठरली तर काहींची रिलेशनशीप सुरु झाली आहे. यात अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल यांच्या नात्याच्या चर्चेनंतर सुष्मिताचा भाऊ राजीव सेन लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. टिव्ही अभिनेत्री चारु असोपा सोबत राजीव याचे सूत जुळले. हे जोडपं डेस्टिनेशन वेडींग करणार असल्याचे म्हटले जात होते. पण राजीवने अचानक काही फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले. 

हे फोटो राजीव आणि चारुच्या लग्नाचे आहेत. हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत चारुने देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत म्हटले आहे की, 'मी चारु असोपा, राजीव सेन यांचा माझे कायदेशीर पती म्हणून स्वीकार करते.' हे लग्नं नोंदणी पध्दतीने झाले आहे. राजीवने पांढऱ्या रंगाचा कुर्ता तर चारुने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर हे नवदांम्पत्य माउंट मेरी चर्च आणि सिद्धीविनायक मंदिरातही आशिर्वाद घेण्यासाठी पोहोचले होते.

sen

नोंदणी पध्दतीने लग्न झाले असले तरी लग्नसमारंभाचे काही कार्यक्रम ही पार पडणार असल्याच्या चर्चा आहेत. चारुने 'अगले जनम मोहे बिटीयाही किजो', 'दिया और बाती हम', 'ये रिश्ता क्या कहलाता है' अशा टिव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. 

sen

sen

sen

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress sushmita sens brother rajeev marries tv actress charu asopa