Video : स्वराने हासडल्या 4 वर्षांच्या मुलाला शिव्या

वृत्तसंस्था
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

स्वराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेटकऱ्य़ांनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच #SwaraAunty हा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेंड झाला आहे. तिच्या या वक्तव्यामुळे एका एनजीओने बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोगात स्वराविरोधात तक्रार केली आहे. त्यामुळे आता हे वक्तव्य तिला भोवते की पब्लिसीटी मिळवून देते हे बघणे महत्त्वाचे आहे.

मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. मग ते भाजपविरोधी भूमिका असो किंवा तिच्या चित्रपटातील 'बोल्ड सीन' असो! या कारणाने ती सोशल मीडियावर ट्रोल होते किंवा सर्वच स्तरांतून तिच्यावर जोरदार टीका होते. अशाच प्रकारे पुन्हा एकदा ती तिच्या एका कृत्याने ट्रोल होत आहे. 

Panipat : सगळं लै भारी, पण अर्जुन कपूर सदाशिवरावांच्या भूमिकेत??

'सन ऑफ अॅबिश' या चॅट शोमध्ये स्वरा आणि कॉमेडियन कुणाल कामरा सहभागी झाले होते. या मुलाखतीत स्वराला तिच्या सुरवातीच्या कारकिर्दीबाबत  स्वराच्या कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात ती जाहिरातींमध्येही काम करायची. तिचा पहिला चित्रपट शूटींग पूर्ण होऊनही प्रदर्शित झाला नाही. ती एका साबणाच्या दाक्षिणात्य जाहिरातीसाठी सेटवर गेली असताना तिथे तिला चार वर्षांचा मुलगा भेटला. तो त्या सेटवरचा स्टार होता. पण स्वराला बघितल्या बघितल्या त्याने तिला 'आंटी' अशी हाक मारली. त्यामुळे स्वरा चिडली आणि तिला त्याला शिव्या घालण्याची इच्छा झाली. पण तिने तिच्या भावनांना आवर घातला आणि मनातल्या मनात शिवी हासडून म्हणली की, याने माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच मला आंटी म्हटलं.' तिच्या या वक्तव्यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल होतीय. 

Bigboss 13 : सिद्धार्थ शुक्लाला का घरातून काढले बाहेर?

स्वराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेटकऱ्य़ांनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच #SwaraAunty हा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेंड झाला आहे. तिच्या या वक्तव्यामुळे एका एनजीओने बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोगात स्वराविरोधात तक्रार केली आहे. त्यामुळे आता हे वक्तव्य तिला भोवते की पब्लिसीटी मिळवून देते हे बघणे महत्त्वाचे आहे.

 

 

 

 

स्वरा भास्कर यापूर्वीही मोदीविरोधी भूमिकेसाठी टीकेची धनी ठरली होती. तसेच विरे दी वेडिंग या चित्रपटातील एका आक्षेपार्ह सीनमुळेही तिची चर्चा झाली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Swara Bhaskar gets troll on twitter for abuses 4 year child