esakal | 'बाई तू कोट उलटा घातलाय'!, स्वराची अजब फॅशन
sakal

बोलून बातमी शोधा

'बाई तू तो कोट उलटा घातलाय'!, स्वराची अजब फॅशन

'बाई तू तो कोट उलटा घातलाय'!, स्वराची अजब फॅशन

sakal_logo
By
युगंधर ताजणे

सोशल मीडियावर (SOCIL MEDIA) नेहमी चर्चेत असणारी सेलिब्रेटी म्हणून अभिनेत्री स्वरा भास्करच्या(SWARA BHASKAR) नावाचा उल्लेख करावा लागेल. या अभिनेत्रीनं आतापर्यत अनेक सेलिब्रेटींशी वाद ओढून घेतला आहे. राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक या कारणामुळे स्वरानं आपला वेगळा फॅन फॉलोअर्सही गोळा केला आहे. स्वरा नेहमीच सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसते. त्यामुळे तिला अनेकदा ट्रोलही व्हावं लागलं आहे. मात्र ती त्याचा फारसा विचार करत नाही. आता ती चर्चेत आली आहे ते तिच्या एका विचित्र प्रकारच्या ड्रेस सेन्समुळे.

स्वरानं तो फोटो शेयर करताना त्याला कॅप्शन लिहिलं आहे. त्यामध्ये ती म्हणते, जेव्हा तुम्ही पावरफुल्ल असता तेव्हा तुम्ही तुम्हाला हवं ते करु शकता. मी पण आज तसचं काहीसं केलं आहे. स्वराच्या या कॅप्शनला चाहत्यांच्या वेगवेगळ्या कमेंट मिळाल्या आहेत. यापूर्वी देखील स्वराच्या ड्रेसिंगला चाहत्यांनी प्रतिसाद दिला होता. आपल्या बोल़्डनेसमुळे भल्याभल्यांची बोलती बंद करणाऱ्या स्वरानं मोठ्या संघर्षमय परिस्थितीतून एक प्रसिद्ध अभिनेत्रीपर्यतचा प्रवास पूर्ण केला आहे. सोशल मीडियावर स्वरा नेहमीच अॅक्टिव्ह असते. सभोवताली घडणाऱ्या अनेक गोष्टींना सोशल मीडियावर शब्दरुप देण्याचं काम ती आवडीनं करते. स्वरानं अशाप्रकारे डे्सिंग केल्यानं तिला काही गंमतीशीर कमेंटही आल्या आहेत. त्यात एकानं ज्यानं कोणी या ड्रेसचं डिझाईन केलं तो वेडा असला पाहिजे असं म्हटलं आहे. आम्हाला आता असं वाटायला लागलं आहे की, स्वराला रणवीरचा हँगओव्हर झाला आहे.

स्वरा एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यात (PUNE) आली होती. त्या दरम्यान तिनं आपला हा खास लूक शेयर केला आहे. नेहमीप्रमाणे त्याला चाहत्यांचा जोरदार प्रतिसादही मिळाला आहे. स्वरानं ब्लॅक ओव्हरसाईज ब्लेजर परिधान केलं आहे. आणि शॉर्टसही घातले आहे. फेमिना अॅवॉर्डससाठी स्वरानं दिलेला तो खास लूक सध्या सोशल मीडियावर चाहत्यांना कमालीचा आवडलाय. त्यांनी तो शेयरही केला आहे. अनेकांनी त्या फोटोवर वेगवेगळ्या कमेंटही दिल्या आहेत. स्वराचा हा आगळा वेगळा प्रयोग चाहत्यांना भावला आहे.

हेही वाचा: स्वच्छ भारत मिशन 2.0 मोहिमेचा PM मोदींनी केला शुभारंभ

हेही वाचा: टीव्ही अभिनेत्रीने संपवलं जीवन; आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहिलं कारण

loading image
go to top