'रश्मी रॉकेट' चित्रपटाचे नोव्हेंबरमध्ये चित्रीकरण; तापसी पन्नू साकारणार महत्वाची भूमिका

संतोष भिंगार्डे
Friday, 21 August 2020

देव डी, लुटेरा, क्वीन, केदारनाथ सारख्या चित्रपटांचे संगीतकार अमित त्रिवेदी आता 'रश्मी रॉकेट'मध्ये आपल्या संगीताने रंग भरणार आहेत.

मुंबई : अभिनेत्री तापसी पन्नू अभिनित स्पोर्ट्स ड्रामा 'रश्मी रॉकेट'च्या चित्रीकरणाला येत्या नोव्हेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. नंदा पेरियासामी, अनिरुद्ध गुहा आणि कनिका ढिल्लन यांनी ही कथा लिहिली आहे आणि आकर्ष खुराना यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री तापसीसोबत या चित्रपटात 'एक्सट्रॅक्शन' फेम प्रियांशु पेंथुली प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

गणेशोत्सवाची मुंबई, ठाणेकरांना भेट; मोडकसागर, तानसापाठोपाठ आणखी एक धरण ओव्हरफ्लो

चित्रपटाच्या चित्रिकरणाविषयी आणि आपल्या भूमिकेविषयी बोलताना तापसी म्हणाली की “मी या प्रोजेक्टमध्ये अगदी सुरुवातीपासून सहभागी आहे आणि त्यासाठी हे सर्व माझ्यासाठी खास आहे. कोरोनाच्या अगदी आधी मी एका स्प्रिंटरच्या व्यक्तिरेखेत उतरण्यासाठी 3 महिन्यांपासून ट्रेनिंग घेत होते. हा एक मोठा ब्रेक झाला आहे. मात्र या विषयामुळे पुन्हा एकदा याची सुरुवात करायला उत्सुक आहे ज्याची सुरुवात ट्रेनिंगने होईल."

आयबीपीएस परिक्षेला लाखो विद्यार्थी मुकणार? पदवीचे अंतिम वर्ष रखडल्याने नुकसान

दिग्दर्शक आकर्ष खुराना याविषयी बोलताना म्हणाले की, "आम्ही चित्रीकरणाला सुरुवात केली होती तेव्हा कोरोनाला सुरुवात झाली होती. मला आनंद आहे की आम्ही लवकरच चित्रीकरणाला पुन्हा  सुरुवात करतो आहोत. माझी टीम आणि मी या प्रवासाला सुरुवात करण्याची आतुरतेने वाट पाहतो आहोत. ही एक शानदार कहाणी आहे जिला सांगण्यासाठी मी फार उत्सुक आहे."

मनसेच्या आरोपांचं महापौरांकडून खंडन, दिलं 'या' शब्दात उत्तर

देव डी, लुटेरा, क्वीन, केदारनाथ सारख्या चित्रपटांचे संगीतकार अमित त्रिवेदी आता 'रश्मी रॉकेट'मध्ये आपल्या संगीताने रंग भरणार आहेत. नेहा आनंद आणि प्रांजल खंडाडीया यांच्यासोबत रॉनी स्क्रूवाला यांची निर्मिती असलेला 'रश्मी रॉकेट' 2021 मध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
---
संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress tapasi pannu will starts shooting of rashmi rocket in november