अभिनेत्री तेजस्विनी पंडितने चाहत्यांसोबत साजरा केला वाढदिवस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमधल्या चाहत्यांनी एकत्र येऊन  अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा वाढदिवस साजरा केला. 

अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा आज (ता. 23 मे) वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमधल्या चाहत्यांनी एकत्र येऊन तिचा वाढदिवस साजरा करायचे ठरवले आणि मंगळवारी रात्री सर्वांनी एकत्र येऊन तेजस्विनीचा वाढदिवस ‘ब्रिंग इन’ केला.

tejaswini pandit

याविषयी तेजस्विनी सांगते, 'दरवर्षी शूटिंग आणि कामाच्या गडबडीतच माझ्या कुटूंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा होतो. पण हा माझा पहिला वाढदिवस आहे, जो मी माझ्या चाहत्यांसोबत सेलिब्रेट केला आहे. त्यामुळे हा वाढदिवस आणि हे सेलिब्रेशन नक्कीच खास आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप टेस्टी केक आणला होता आणि माझ्या कारकिर्दीतल्या महत्वाच्या भूमिकांच्या फोटोंचे एक छान कोलाज असलेली फ्रेम त्यांनी मला गिफ्ट केली. एका कलाकाराला यापेक्षा अधिक ते काय हवं असतं. चाहत्यांच्या या प्रेमासाठीच तर आम्ही काम करतो.' 

Tejaswini pandit

tejaswini pandit

tejaswini pandit

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Actress Tejaswini Pandit celebrates birthday with fans