वर्षाने बदलला लूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

मूळच्या गोव्याच्या असणाऱ्या वर्षा उसगांवकर यांना कोकणी चित्रपटात आणण्याची किमया कोकणी मराठी लेखक-दिग्दर्शक हॅरी फर्नांडीस यांनी साधली आहे.

काही कलाकार आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर प्रादेशिक चित्रपटसृष्टीपासून थेट बॉलीवूडपर्यंत आपला दबदबा निर्माण करतात. पण त्यांना मातृभाषेतील चित्रपटात काम करण्याची संधी कधीच मिळत नाही. अभिनेत्री वर्षा उसगांवकरांच्या बाबतही असंच काहीसं घडलंय. मातृभाषा कोकणी असूनही वर्षा उसगांवकर आजवर कधीही कोकणी चित्रपटात दिसल्या नव्हत्या. प्रथमच त्या एका कोकणी चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत.

वर्षा उसगांवकर यांनी आजवर मराठी, हिंदी तसंच राजस्थानी चित्रपटातही अभिनय केला आहे. मूळच्या गोव्याच्या असणाऱ्या वर्षा उसगांवकर यांना कोकणी चित्रपटात आणण्याची किमया कोकणी मराठी लेखक-दिग्दर्शक हॅरी फर्नांडीस यांनी साधली आहे. वर्षा यांनी प्रवाहासोबत वाटचाल करीत जुन्या-नव्या कलाकार-दिग्दर्शकांसोबतही यशस्वीपणे काम केलं आहे. याच कारणामुळे आजही त्या कोणतीही भूमिका सक्षमपणे साकारू शकतात. 90 च्या दशकात मराठी प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणाऱ्या वर्षा उत्तम नृत्यांगना असून भूमिकेच्या मागणीनुसार नेहमीच त्यांनी नृत्यकला प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. 

या चित्रपटातल्या आपल्या भूमिकेविषयी त्या सांगतात की, “माझी मातृभाषा असलेल्या  या चित्रपटात दिग्गज गोवन कलाकारांसोबत काम करताना मला खूप मजा आली. पैसा वसूल धमाल कॉमेडी असणारा हा चित्रपट प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करेल.” असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. या चित्रपटातील गाणी कोकणी संगीत रसिकांवर मोहिनी घालण्यात यशस्वी ठरत आहेत.

या चित्रपटात सासू आणि जावई यांची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी वर्षा उसगांवकर यांचा लुकही बदलण्यात आला आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Varsha Usgavkar Changes Her Look For New Movie