'महिला प्रधान चित्रपटांमध्ये सेलिब्रेटी अभिनेत्यांना रस नसतो'

फेमिनिस्ट मुव्हीमध्ये (feminist movie) विद्याचा सहभाग नेहमीच दिसून आला आहे.
actress vidya balan
actress vidya balan Team esakal

मुंबई - बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री विद्या बालन (bollywood actress vidya balan) आपल्य़ा हटकेपणाबद्दल प्रख्यात आहे. ती सध्या तिच्या शेरनी (sherni movie) नावाच्या चित्रपटासाठी चर्चेत आली आहे. तिचा हा चित्रपट 18 जूनला अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. त्यात तिनं एका फॉरेस्ट अधिका-याची भूमिका साकारली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. विद्यानं या चित्रपटाच्या निमित्तानं एक प्रतिक्रिया दिली आहे. त्याला चाहत्यांचा तितक्याच उत्साहानं रिप्लाय मिळताना दिसत आहे. ( Actress vidya balan said male actors do not want to do female centric films)

फेमिनिस्ट मुव्हीमध्ये (feminist movie) विद्याचा सहभाग नेहमीच दिसून आला आहे. यापूर्वी तिच्या द डर्टी पिक्चर (the dirty picture) , शकुंतला देवी (shakuntala devi), सारख्या चित्रपटांमधून तिनं तो मुद्दा प्रभावीपणे मांडला होता. विद्याचे असे म्हणणे आहे की, ज्यावेळी महिला प्रधान सिनेमे तयार होत असतात त्यावेळी पुरुष कलाकार त्यात सहजासहजी काम करण्यास तयार होत नाही. असा आजवरचा तिचा अनुभव आहे. तिच्या अशाप्रकारच्या वक्तव्यामुळे ती प्रसिध्दीच्या झोतात आली आहे. विद्यानं काही वर्षांपूर्वी द डर्टी पिक्चरमधून सिल्क स्मिताची भूमिका साकारली होती. त्याला चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता.

काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, फिमेल सेंट्रिक (female centric) चित्रपटामध्ये मोठमोठ्या सेलिब्रेटी अभिनेत्यांना काम करण्याची इच्छा नसते. त्यावर विद्या म्हणते, प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, ज्यावेळी फिमेल सेंट्रिक चित्रपट तयार करण्याची वेळ येते तेव्हा मेल अॅक्टर शोधणे हेच मोठे आव्हान असते. कारण त्यांना अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करण्यात काही रस नसतो.

actress vidya balan
'मला दुसरा सुशांतसिंग राजपूत व्हायचं नाही'
actress vidya balan
'न्याय द जस्टीस' मधून उलगडणार सुशांतच्या आत्महत्येचे रहस्य ?

आपण नेहमी प्रवाहाच्या विरोधात जाऊन काही वेगळं कऱण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यत त्या प्रयत्नांना सुजाण प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे मी आनंदी आहे. बॉलीवू़डमध्ये जे आहे ते मोठ्या धाडसानं मांडण्याचा प्रयत्न विद्यानं केला आहे. तिच्या आतापर्यतच्या फेमिनिस्ट टाईप मुव्हीमध्ये मोठ्या सेलिब्रेटी कलाकारांनी काम केल्याची उदाहरणे कमी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com