दंगल गर्ल झायरा वसीम पुन्हा ट्रोल.. काही म्हणाले 'विषारी साप' तर काहींनी म्हटलं 'चुहे खाके बिल्ली हज को चली..' जाणून घ्या काय आहे प्रकरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

दंगल गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली झायरा वसीम सिनेमांपासून दूर जरी असली तरी ती सोशल मिडियावर चांगलीच ऍक्टीव्ह असते. सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ती अनेकदा न घाबरता तिचं मत सोशल साईटवर बिनधास्तपणे मांडताना दिसते.

मुंबई- कोरोनाचं जागतिक संकट समोर असतानाच आता पाकिस्तानमार्गे आलेल्या टोळधाडीमुळे सगळ्यांच्या मनात धडकी भरलीये. या टोळधाडीने आत्तापर्यंत अनेक शेतक-यांच्या पिकांचं नुकसान केलं आहे. या टोळधाडीचं संकट रोखण्यासाठी सरकारने काही सूचना जाहीर केल्या आहेत. याचदरम्यान बॉलीवूड अभिनेत्री झायरा वसीमने भारतात आलेल्या टोळधाडीवर अशी प्रतिक्रिया दिलीये की त्यामुळे तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागतोय.

हे ही वाचा: लॉकडाऊनमध्ये भावासोबत किराणा खरेदीसाठी गेलेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला कोणीच ओळखू शकलं नाही..

दंगल गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली झायरा वसीम सिनेमांपासून दूर जरी असली तरी ती सोशल मिडियावर चांगलीच ऍक्टीव्ह असते. सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ती अनेकदा न घाबरता तिचं मत सोशल साईटवर बिनधास्तपणे मांडताना दिसते. नुकतंच झायराने भारतात आलेल्या टोळधाडीला माणसांचं कर्म आणि त्यांच्यासाठी असलेली ही पूर्वसूचना असल्याचं म्हटलं आहे. 

झायराने तिच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन कुराणातील काही ओळींचा उल्लेख करत लिहिलंय, टोळधाडीसोबतंच सध्या जी काही संकटं पाहायला मिळतायेत ती सगळी माणसांच्या वाईट कर्मांची फळं आहेत. झायराने तिच्या या ट्वीटमध्ये काही संकंटांचा उल्लेख देखील केला आहे. तिच्या या ट्वीटनंतर सोशल मिडियावर तिला चांगलंच ट्रोल केलं जातंय. 

एका युजरने झायराला ट्वीट करत लिहिलं आहे, 'ट्वीट करणं इस्लाममध्ये हराम आहे.' तर दुस-या एका युजरने तिला म्हटलं, 'या सापाने पाहा कसं विष टाकलं आणि पळून गेला याचं उत्तम उदाहरण आहे झायरा वसीम.' इतकंच नाही तर झायराला ट्रोल करण्यांची संख्या खूप जास्त आहे. त्यातील एकाने तर झायराला ट्रोल करत ट्वीट करत म्हटलंय, '१००० चुहे खाने के बाद बिल्ली हज को चली.'

 

टोळधाडीच्या संकटामुळे शेतक-यांमध्ये भितीचं वातावरण आहे. आत्तापर्यंत पंजाब, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगढ मधील शेतक-यांच्या पिकांचं या टोळधाडीमुळे नुकसान झालं आहे.यानंतर केंद्राने याबाबत १६ राज्यांना इशारा दिला आहे.  

actress zaira wasim gets trolled after locust attack called people sin  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress zaira wasim gets trolled after locust attack called people sin