'त्याने मला चुकीचा स्पर्श केला', या बॉलीवूड अभिनेत्रींनीही सांगितलाय लैंगिक शोषणाचा धक्कादायक अनुभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Sexually Abused

'त्याने मला चुकीचा स्पर्श केला', या बॉलीवूड अभिनेत्रींनीही सांगितलाय लैंगिक शोषणाचा धक्कादायक अनुभव

लैंगिक शोषणाचे अनेक धक्कादायक प्रकार नेहमीच समोर येतात. काहीजण या गोष्टी सगळ्यांसमोर उघड करायाला घाबरतात. तर काही खुलेपणाने यावर भाष्य करतात.आरोपीविरोधात आवाज उठवतात. अनेकदा लहान मुलांना लैंगिक छळाचे बळी बनवले जाते.

बॉलीवूडमधील अनेक कलाकरही या भयानक टप्प्यातून गेले आहेत. नुकतच अभिनेते पियुष मिश्रा यांनीही नातातल्या महिलेने त्यांच लैंगिक शोषण केल असल्याचा खुलासा केला.

त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेत्री खुशबू सुंदरने देखील खुद्द तिच्या वडिलांवरच अनेक गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितले की, 'मी आठ वर्षांची असल्यापासून माझे वडील माझं लैंगिक शोषण करत होते. जेव्हा मी १५ वर्षांची झाले, तेव्हा माझ्यामध्ये त्यांच्याविरोधात बोलण्याची हिंमत आली. कुटुंबातील इतर सदस्यांना त्रास सहन करावा लागू नये, म्हणून मी आठ वर्षं गप्प राहिले.'

मात्र बॉलिवुडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्याच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक अनुभव जगासमोर ठेवला. कंगना रणौतने जेव्हा मुनव्वर फारूकीच्या बालपणीच्या लैंगिक शोषणाची कहाणी लॉकअपमध्ये ऐकली तेव्हा तिला तिची जुनी वेदनाही आठवली.

कंगना म्हणाली, “माझ्यासोबतही असे घडले, मी खूप लहान असताना आमच्या गावातील एक मुलगा मला अयोग्य पद्धतीने स्पर्श करायचा आणि मला समजत नव्हते की काय होत आहे. तो माझ्यापेक्षा तीन-चार वर्षांनी मोठा होता. मला वाटते की तो त्याच्या लैंगिकतेचा शोध घेत होता. तो आम्हाला आमचे कपडे काढायला सांगायचा आणि आमच्यावर लक्ष ठेवायचा. तेव्हा आम्ही खूप लहान होतो."

पद्मावत चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दीपिकाने तिच्या भूतकाळाबद्दल खुलासा केला होता. ती म्हणाली होती की, “मी 14 किंवा 15 वर्षांची होते. मला आठवतं की एका संध्याकाळी मी माझ्या कुटुंबासोबत रस्त्याने जात होते. आम्ही बहुधा एका रेस्टॉरंटमध्ये जेवलो. माझी बहीण आणि माझे वडील पुढे चालत होते आणि माझी आई आणि मी मागे चालत होतो. तितक्यात एक व्यक्ती माझ्या खूप जवळून मला स्पर्श करुन निघून गेला. त्यावेळी, मी त्याकडे दुर्लक्ष करू शकले असतो, पण मी त्याचा पाठलाग केला, त्याला कॉलर पकडले आणि त्याला रस्त्याच्या मधोमध मारले.”

त्याच बरोबर सोनम कपूरने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता की, बालपणी तिचा विनयभंग झाला होता. अभिनेत्री म्हणाली, “ मी लहान असताना माझा विनयभंग झाला होता आणि ते खूप वेदनादायक होते. एक व्यक्तीनं तिच्या ब्रेस्टला हात लावला. ती थरथरू लागली आणि रडू लागली. भीतीने ती गप्प बसली असली. ती कोणालाच काही बोलली नाही.

केवळ याच अभिनेत्री नाहित तर नीना गुप्ता हिचाही डॉक्टर आणि टेलरने विनयभंग केला आहे. याचा खुलासा तिने आपल्या पुस्तकात केला आहे. नीना गुप्ताशिवाय तापसी पन्नू, अक्षय कुमार, अनुराग कश्यपसह अनेक स्टार्स लैंगिक शोषणाचे बळी ठरले आहेत.