आदिल हुसैन यांच्या 'वॉट विल पिपल से'ची ऑस्करमध्ये एंन्ट्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

सध्या 'फॉरेन लॅन्ग्वेज फिल्म्स'मध्ये प्रवेश मिळाला असला तरी या कॅटेगरीत सिनेमाला स्पर्धा करण्याची संधी मिळावी अशीही आशा आदिल यांनी व्यक्त केली आहे.

नॉर्वे कडून बॉलिवू़ड अभिनेता अभिनीत आदिल हुसैनचा सिनेमा 'वॉट विल पिपल से'ला ऑस्कर 2019 च्या 'फॉरेन लॅन्ग्वेज फिल्म्स'मध्ये प्रवेश मिळाला आहे. 

मंगळवारी आदिल हुसैन यांनी याविषयी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन ट्विट केले आहे. त्यांनी सिनेमाची टिम आणि कलाकार यांचे अभिनंदन केले आहे.
 

Adil Hussain

 

सध्या 'फॉरेन लॅन्ग्वेज फिल्म्स'मध्ये प्रवेश मिळाला असला तरी या कॅटेगरीत सिनेमाला स्पर्धा करण्याची संधी मिळावी अशीही आशा आदिल यांनी व्यक्त केली आहे. इराम हक यांनी 'वॉट विल पिपल से'चे दिग्दर्शन केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adil Hussains Who Will Pipal Sey is an Oscars Entry