
Aditi Rao Hydari: 'तुझ्यात अन् सिद्धार्थमध्ये काय चाललयं?', आदिती लाजली अन् म्हणाली, 'मला आता ..'
Aditi Rao Hydari: बॉलिवूड आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील अदिती राव हैदरी ही सर्वोत्कृष्ट आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती लाखो चाहत्यांच्या हृदयांवर राज्य करतात. सध्या आदिती संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या वेबसिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काल या वेब सीरिजचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या लूकनं सगळ्यांनाच वेड करून सोडलं आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त 'हीरामंडी' ची चर्चा सुरु आहे.
या वेब सीरिजमध्ये आदितीसोबत मनीषा कोईराला,सोनाक्षी सिन्हा, रिचा चड्ढा, संजीदा शेख, शर्मिन सेगल या सगळ्यांचा रॉयल लूक समोर आला आहे.त्याच वेळी, फर्स्ट लूक लॉन्च करताना वेब सीरिजच्या कलाकारांना वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. याचवेळी , आदिती सिद्धार्थला डेट करत असल्याच्या अफवांवरही प्रश्न विचारण्यात आला.
वास्तविक हिरामंडी या वेब सीरिजच्या फर्स्ट लूक लॉन्चवेळी उपस्थित पत्रकारांनी कलाकार आणि संजय लीला भन्साळी यांना वेब सिरीज आणि भूतकाळातील कामांबाबत काही प्रश्न विचारले. त्यानंतर एका पत्रकाराने आदितीला तिच्या आणि सिद्धार्थच्या डेटिंगबद्दल प्रश्न विचारला. यावर आदितीने या प्रकरणावर बोलणं टाळलं आणि मला खुप भूक लागली आहे. आता मी काहीतरी खाणार असल्याचं कारण देत तेथून निसटली.

यापूर्वी सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये त्याने टी-शर्ट घातला होता. हा फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांचा अंदाज होता की हे दोन्ही कलाकार एकमेकांना डेट करत असावेत. कारण याआधी अदितीही असाच टी-शर्ट घालून दिसली होती.

डेटिंगच्या अफवांनंतरही दोघांना अनेकवेळा एकत्र पाहिले गेले आहे. ते अनेकदा एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करतानाही दिसतात. याशिवाय दोघांची जोडीही चाहत्यांना आवडते. रिपोर्ट्सनुसार, दोघांची कथा महासमुद्रम चित्रपटापासून सुरू झाली. तथापि, डेटिंगच्या या अफवांमध्ये, आदिती आणि सिद्धार्थने याबद्दल कोणतीही सांगितलेले किंवा ते मान्य केलेले नाही.