आदितीची स्वप्नपूर्ती 

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

"रॉकस्टार', "देल्ली 6', "ये साली जिंदगी' अशा चित्रपटातून सपोर्टिंग ऍक्‍ट्रेस म्हणून काम केल्यानंतर आदितीला "लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क' या चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाली. तेव्हा तिच्या अभिनयाची चुणूक संपूर्ण बॉलीवूडला कळली. तो चित्रपट फ्लॉप गेला तरीही तिचा अभिनय उठावदार झाला. त्यानंतर "वझीर', "बॉस', "मर्डर 3' या चित्रपटातून मुख्य भूमिका तिला करायला मिळाली. पण आदितीने आपल्या करियरची सुरुवात साऊथ चित्रपटांमधून केली होती आणि लहानपणापासून तिचं स्वप्न होतं, की तिला दिग्दर्शक मणी रत्नम यांच्याबरोबर काम करायला मिळावं. आता तिचं हे स्वप्न पूर्ण झालंय.

"रॉकस्टार', "देल्ली 6', "ये साली जिंदगी' अशा चित्रपटातून सपोर्टिंग ऍक्‍ट्रेस म्हणून काम केल्यानंतर आदितीला "लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क' या चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाली. तेव्हा तिच्या अभिनयाची चुणूक संपूर्ण बॉलीवूडला कळली. तो चित्रपट फ्लॉप गेला तरीही तिचा अभिनय उठावदार झाला. त्यानंतर "वझीर', "बॉस', "मर्डर 3' या चित्रपटातून मुख्य भूमिका तिला करायला मिळाली. पण आदितीने आपल्या करियरची सुरुवात साऊथ चित्रपटांमधून केली होती आणि लहानपणापासून तिचं स्वप्न होतं, की तिला दिग्दर्शक मणी रत्नम यांच्याबरोबर काम करायला मिळावं. आता तिचं हे स्वप्न पूर्ण झालंय. आदितीने "कातरू वेलियिडाई' या तमीळ चित्रपटात काम केलंय. ती म्हणते, या चित्रपटात काम करून मी ते स्वप्न पूर्ण केलंय. मी हा चित्रपट करायचं ठरवलं. कारण या चित्रपटातील माझी भूमिका मला खूपच भावली. मी स्क्रिप्ट वाचायला सुरुवात केली आणि तिचा शेवट वाचेपर्यंत माझ्या डोळ्यात पाणी होतं. आदितीे या चित्रपटासाठी तमीळ भाषा शिकली. नवीन चॅलेंज स्वीकारलं आणि या नवीन कामासाठी सज्ज झालीय. 

Web Title: Aditi's Dream project