Aditya Chopra B'day: सासऱ्याने दिली सुनेची साथ; अन् लेकालाचं दिलं हकलून! राणीसाठी आदित्य चोप्रा झाले होते बेघर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Chopra Birthday story his father yash was unhappy on his divorce decision with payal for rani mukherjee

Aditya Chopra B'day: सासऱ्याने दिली सुनेची साथ; अन् लेकालाचं दिलं हकलून! राणीसाठी आदित्य चोप्रा झाले होते बेघर

Aditya Chopra Birthday: 'डीडीएलजी' म्हणजेच 'दिल वाले दुल्हनिया ले जायेंनगे' या अजरामर चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य चोप्राचा आज वाढदिवस. आदित्यने घडवलेली ही कलाकृती आजही कुणी विसरु शकलेलं नाही.

आदित्यने आजवर अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले. हा वारसा त्याला वडिलांकडून म्हणजेच बॉलीवुडमध्ये दिग्गज मानले जाणारे दिग्दर्शक- निर्माते यश चोप्रा यांच्याकडून मिळाला. यशनेही त्या कलेचे सार्थक करून अनेक दर्जदार कलाकृती समोर आणल्या.

आदित्य त्याच्या चित्रपटा[पेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेही बराच चर्चेत राहिला, आणि त्यातीलच एक कारण होते आदित्य आणि राणी मुखर्जी यांचे प्रेमकरण.. आज आदित्यचा वाढदिवस.. त्यानिमित्ताने जाणून घेऊया ही खास बात..

(Aditya Chopra Birthday story his father yash was unhappy on his divorce decision with payal for rani mukherjee)

आदित्य चोप्राने अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत 2014 मध्ये लग्न केलं. पण हे आदित्यच दुसरं लग्न होतं. पायल चोप्रा ही आदित्यची पहिली बायको, जिला आदित्यने राणीसाथी घटस्फोट दिला. पण हे इतकं सोप्पं नव्हतं. या निर्णयात आदित्यच्या घरच्यांनी मात्र त्याला प्रचंड विरोध केला.

राणी मुखर्जीसोबत दुसरं लग्न करणं आदित्य चोप्राचे वडील यश चोप्रा आणि आई पामेला यांना मान्य नव्हतं. यावेळी त्यांच्या घरात अनेक वाद आणि खटके उडाले. असं म्हणतात की, यश चोप्रा हे आदित्यचं पहिलं लग्न मोडण्याच्या विरोधात होते.

पण राणीमुळे आदित्य आणि पायल याच्या आयुष्यात खूप तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आदित्य चोप्राने पायलला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचे वडील यश चोप्रा यांनी सुनेची बाजू घेतली. त्यांना हा घटस्फोट होऊ द्यायचा नव्हता.

शेवटी वाद आणि विरोध इतका वाढला की आदित्य चोप्राला वडिलांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं. यश चोप्रा यांनी स्वतःच्या मुलालाच बाहेरची वाट दाखवली त्यामुळे आदित्यला घर सोडावं लागलं.

त्यानंतर आदित्य चोप्रा तब्बल 1 वर्षे एका हॉटेलमध्ये राहात होता. यानंतर आदित्यच्या आईने मध्यस्ती करत बापलेकातील संबंध पुन्हा सुधारले.