esakal | 'यापुढे इंडियन आयडलचं 'होस्टिंग' करणार नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

aditya narayan

'यापुढे इंडियन आयडलचं 'होस्टिंग' करणार नाही'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

भारतीय मनोरंजन क्षेत्रात आपल्या लोकप्रियतेनं सर्वांना जिंकून घेतलेला शो म्हणून इंडियन आयडॉलचे नाव घ्यावे लागेल. सध्या त्या शो चा 12 वा सीझन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून हा शो चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी शो आणि त्याच्यातील वेगळेपणावर ठेवलेले बोट. दोन आठवड्यांपूर्वी अभिजित सावंत, राहुल वैदय यांनी या शो मध्ये जे काही चालते त्यावर भाष्य केले होते. त्याच्याही अगोदर किशोर कुमार यांचे चिरंजीव अमित कुमार यांनीही या शो मध्ये यायचे तर स्पर्धकांचे कौतूक करावेच लागते. असे सांगितले होते. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. (aditya narayan to quit hosting tv shows in 2022 in a statement yst88)

आता शो चा होस्ट आदित्य नारायण यानं एक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. त्याचे असे म्हणणे आहे की, दोन वर्षांनी या शो मध्ये होस्टिंग करणार नाही. हा शो आपण सोडून देणार असल्याचे त्यानं सांगितले आहे. 15 ऑगस्टला इंडियन ऑयडॉल मालिकेचा शेवट होणार आहे. यादिवशी यंदाच्या सीझनचा विजेता घोषित केला जाणार आहे. दरम्यान आदित्यनं प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यानं 2022 नंतर होस्टिंग करणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

एका मुलाखतीच्या दरम्यान आदित्यनं सांगितलं, आता वेळ आली आहे की, मी वेगळा निर्णय घ्यावा. एक वेगळा प्रयोग म्हणून मी ही जबाबदारी स्वीकारली होती. आता त्याला बराच वेळ झाला आहे. त्यातून मुक्त होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मी 2022 नंतर या शो चा होस्ट असणार नाही. हा निर्णय मी माझ्या मतानं घेतला आहे. त्यात कुणाचाही दबाव नाही. स्वताशी काही गोष्टी मी ठरवल्या होत्या. त्याच्यापासून मला वेगळं पडता येणार नाही.

हेही वाचा: 'राज कुंद्रामुळेच पॉर्न क्षेत्रात,व्हिडिओसाठी द्यायचा 30 लाख'

हेही वाचा: HDB Shefali Shah: शेफाली शाहने साकारलेल्या सर्वोत्कृष्ट भूमिका

पुढील वर्षभरासाठी मी टीव्ही क्षेत्रापासून ब्रेक घेणार आहे. त्याला माझी अशी काही वेगळी कारणे आहेत. याचे प्लॅनिंग मी आधीपासून केले आहे. अनेक गोष्टी एकाच वेळी करता येत नाहीत. त्यामुळे मला माझ्यावर अतिरिक्त कामाचा ओझं वाढवून घ्यायचं नाही. त्यासाठी योग्य ती काळजी घेतली आहे. असंही आदित्यनं यावेळी सांगितलं.

loading image