तो आदित्य पांचोलीच; कंगनाचे सूचक वक्तव्य

टीम ई सकाळ
रविवार, 3 सप्टेंबर 2017

आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे कंगना सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच आपण 17 वर्षांचे असल्यापासून आपल्यावर अनेकांनी चान्स मारण्याचा प्रयत्न केला असं धक्कादायक विधान केले होते. त्याचा पुढचा भाग कंगनाने शनिवारी एका टिव्ही शोमध्ये कथन केला. तिच्यावर शारिरीक, मानसिक अत्याचार करणाऱ्यात तिने नाव घेतले आहे ते अभिनेता आदित्य पांचोलीचे. मी त्याच्या  बायकोकडे केले. आणि प्लीज तुम्ही मला वाचवा अशी विनवणी केली होती, अशी आठवणही यावेळी तिने सांगितली.

मुंबई : आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे कंगना सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच आपण 17 वर्षांचे असल्यापासून आपल्यावर अनेकांनी चान्स मारण्याचा प्रयत्न केला असं धक्कादायक विधान केले होते. त्याचा पुढचा भाग कंगनाने शनिवारी एका टिव्ही शोमध्ये कथन केला. तिच्यावर शारिरीक, मानसिक अत्याचार करणाऱ्यात तिने नाव घेतले आहे ते अभिनेता आदित्य पांचोलीचे. मी त्याच्या  बायकोकडे केले. आणि प्लीज तुम्ही मला वाचवा अशी विनवणी केली होती, अशी आठवणही यावेळी तिने सांगितली. 

आपण 17 वर्षांचे असताना आपल्या वडिलांपेक्षाही वयाने मोठे असलेल्या व्यक्तीने आपल्यावर अत्याचार केला होता हे तिने सांगितले होते. आता तो आदित्य पांचोलीच होता अशी खात्री पटली आहे. एका टिव्ही शोमध्ये तिने ही बाब उघड केली आहे. यापूर्वीच आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली जिया खानच्या प्रकरणी वादात अडकला आहे. अशात कंगना राणावत सारख्या अभिनेत्रीने आदित्यचे नाव घेतल्याने पांचोली कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

आदित्य आणि कंगना अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले होते. यांचे सातत्याने एकत्र राहाणे मीडियाच्याही नजरेत आले होते. या दोघांनी गुपचुप लग्न केल्याच्या बातम्याही काही वर्षांपूर्वी आल्या होत्या. त्यावेळी कंगना गॅंगस्टरसारखे चित्रपट करत होती. 

Web Title: Aditya Pancholi abused Kangana ranaut actress esakal news