पूजा हेगडेचा अॅडव्हान्स एरियल योगा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

सध्या कलाकारांना फिटनेसचं वेड लागलंय. त्यासाठी कोणी योगशास्त्राचा आधार घेतं; तर कोणी डाएट आणि डान्स किंवा पोलडान्स. आपल्या बिझी शेड्युलमधूनही कलाकार वर्कआऊटसाठी वेळ काढतातच. आता "मोहेन्जोदारो'फेम अभिनेत्री पूजा हेगडेचंच पाहा ना. तसंही ती नेहमी स्पेशल वर्कआऊट करत असते. इतकंच नाही, तर तिच्या वर्कआऊटचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअरही करते. त्यात ती नेहमी वेगवेगळे वर्कआऊट आणि योग करताना दिसते.

 pooja hegde yoga

सध्या ती एका तेलगू चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अमेरिकेत गेलीय. तिथे चित्रीकरण करायचं सोडून ती ऍडव्हान्स एरियल योगचे धडे गिरवतेय. चित्रीकरणातून वेळ मिळाला की, एरियल योगचे प्रशिक्षण न चुकता घेतेय. आता हेही स्वतःसाठी करत्येय की आगामी प्रोजेक्‍टसाठी ते गूढच आहे!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aerial yoga by pooja hegade