
प्रख्यात दिग्दर्शिका मीरा नायर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेलं नाव. आता त्यांनी तयार केलेल्या य़ा नव्या को-या मालिकेवर गेल्या काही महिन्यांपासून टीका केली जात आहे.
मुंबई - काही झालं तरी एखाद्या कलाकृतीला नावं ठेवायचीच अशी मानसिकता तयार केली असल्यास त्यातून हाती निराशाच येते. त्या कलाकृतीला हवा असणारं अभिव्यक्ती स्वातंत्र्य तथाकथित ठेकेदारांच्या हातात असल्याने शेवटी ती कलाकृती खेळणं होऊन जाते. अशावेळी त्यातील सकस आशय मारला जाऊन निव्वळ उथळता प्रिय, मनोरंजनात्मक कलेला वाव मिळण्यास सुरुवात होते. प्रसिध्द साहित्यिक विक्रम सेठ यांच्या अ सुटेबल बॉयच्या बाबत असेच काहीसं झालं.
प्रख्यात दिग्दर्शिका मीरा नायर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेलं नाव. आता त्यांनी तयार केलेल्या य़ा नव्या को-या मालिकेवर गेल्या काही महिन्यांपासून टीका केली जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मंदिरात दाखविण्यात आलेला किसिंगचा सीन. त्यामुळे या दिग्दर्शिकेला ट्रोल करण्यात आले होते. तसेच त्यामुळे नेट फ्लिक्सलाही टार्गेट करण्यात आले. वाद वाढतच गेला. ज्यांनी ही मालिका पाहिली आहे त्यांना यातील आशय आणि त्याच्याशी संबंधित असलेला तत्कालीन देशाची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संदर्भ महत्वाचा आहे.
अलीकडे आशयापेक्षा उथळपणाला महत्व येण्याचे वा ते जाणीवपूर्वक देण्याचे दिवस आहेत. 1952 साली भारतात पहिल्यांदा ज्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या त्याचे पडसाद समाजावर कशाप्रकारे पडसाद उमटले हे सांगणारी मालिका म्हणजे अ सुटेबॉल बॉय. भारत नुकताच स्वतंत्र झालेला. अशावेळी त्याच्यात अद्याप शिल्लक असलेली पारतंत्र्याची भावना, काहींनी यानिमित्तानं नवजागर करण्याचा सोडलेला संकल्प तर अजूनही भूतकाळातल्या त्या भग्न अवशेषांना कवटाळून बसलेल्या एका पिढीचे कथानक मालिकेतून उलगडण्यात आले आहे.
सहा भागातील ही मालिका बघताना दिग्दर्शिकेनं घेतलेली मेहनत लक्षात येते. वेशभुषा, रंगभूषा, संवाद, छायालेखन, याचा बारकाईनं केलेला विचार महत्वाचा ठरतो. एका हिंदू आणि मुस्लिम कुटूंबातील दोघांची प्रेमकहाणी, त्याला असणारा धार्मिक रंग, वाद, व्देष, अन्याय अशा संमिश्र प्रकारच्या भावना मालिकेतून दाखविण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त मेहरा आणि कपूर या दोन फॅमिलीचा संघर्ष त्यात मांडण्यात आला आहे. लताला प्रेम झालं. तिचं एका मुस्लिम तरुणावर प्रेम बसलं. पण त्याच्य़ाशी लग्न करण्यात असलेला अडथळा, दुसरीकडे कपूर घराण्यातल्या मानचं जिच्यावर प्रेम बसलं आहे ती गाणारी बाई आहे. यातून मार्ग काढणारी ही मालिका आहे.
कंगणाशी भांडला, दिवसभरात 4 लाख फॉलोअर्स वाढले
शिक्षण, मानमरातब, सामाजिक संकेत हे सर्व कसोशिनं पाळणारी ही दोन कुटूंबे सतत संघर्षात आहेत. त्यांना स्वस्थता नाही. ती वेगवेगळ्या रंगाच्या छटा, कॅमेराचे अँगल यातून सुंदरतेनं मीरा नायर यांनी पडद्यावर मांडले आहे. त्यामुळे आशय आणि तांत्रिकदृष्टया ही मालिका पाहण्यासारखी आहे.
सलमानची बहिण हॉटेलातील प्लेट फोडत बसली ; व्हिडिओ व्हायरल
त्यावर होणारा वाद का कुणामुळे आणि कशासाठी हा ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा भाग आहे. मात्र कुणी वादग्रस्त म्हणते म्हणून इतरांनीही त्या मालिकेवर टीकेचा आसूड तार्किकता बाजूला ठेऊन ओढावा हे पटत नाही.