'भिकारी'नंतर ऋचा दिसेल 'वेडिंग चा शिनेमा'त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मार्च 2019

'भिकारी' सिनेमानंतर ऋचाने 'वेडिंग चा शिनेमा' हा चित्रपटच का निवडला यावर ऋचा सांगते, 'भिकारी'नंतर मधल्या काळात मी विविध जाहिराती, काही शॉर्ट फिल्म्स आणि वेबसिरीज मध्ये काम केलं.

ऋचा इनामदार या अभिनेत्रीने व्यावसायिक चित्रपटाच्या पदार्पणातच 'भिकारी' या चित्रपटात स्वप्नील जोशीच्या नायिकेची भूमिका केली. डेन्टिस्ट्री करतानाही ऋचाला असलेली अभिनयाची आवड तिने जपत अभिनयाला सुरवात केली. आता ऋचा 'वेडिंग चा शिनेमा' या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

'भिकारी' सिनेमानंतर ऋचाने 'वेडिंग चा शिनेमा' हा चित्रपटच का निवडला यावर ऋचा सांगते, 'भिकारी'नंतर मधल्या काळात मी विविध जाहिराती, काही शॉर्ट फिल्म्स आणि वेबसिरीज मध्ये काम केलं. त्यामुळे मला मराठीमध्ये अनेक ऑफर्स आल्या पण, एक अभिनेत्री म्हणून मला एकाच भूमिकेत अडकून पडायचं नव्हतं. अभिनयात मला स्वतःलाच आजमावून पाहायला आवडतं. म्हणून मी स्वतःवर भाषेचं बंधन ठेवलं नाही. मला प्रत्येक भूमिका ही पहिल्या भूमिकेपेक्षा वेगळी करायची होती. मराठीत काम करताना जे सुख मिळतं ते कुठेच मिळत नाही. मराठीमध्ये असलेले कथानक, विषय हे खरंच खूपच प्रगल्भ आणि सुंदर असतात. जेव्हा मला या 'वेडिंग चा शिनेमा' चित्रपटाबद्दल विचारणा झाली तेव्हा मी लगेच होकार दिला. चित्रपटाचा विषय मजबूत आहे.'

लवकरच ऋचा तिग्मांशू धुलिया दिग्दर्शित बीबीसीच्या 'क्रिमिनल जस्टीस' या वेबसिरीज मध्ये दिसणार आहे.

rucha

rucha


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Bhikari film Rucha Inamdars next film is wedding cha shinema