लॉकडाऊनमध्ये 'गुलाबो सिताबो' नंतर विद्या बालन स्टारर 'शकुंतला देवी' सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला..

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

'गुलाबो सिताबो' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होत असतानाच आता विद्या बालन स्टारर शकुंतला देवी हा सिनेमा सुद्धा आता ओटीटीवर रिलीज करणार असल्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतलाय. विद्या बालन साकारत असलेल्या या शकुंतला देवी कोण आहेत?

मुंबई- लॉकडाऊनमध्ये मनोरंजनासाठी प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेताना दिसत आहेत. मात्र आता प्रेक्षकांसोबतंच निर्मात्यांनीही त्यांचा मोर्चा डिजीटलकडे वळवलेला दिसत आहे.  नुकताच अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना स्टारर 'गुलाबो सिताबो' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करणार असल्याचं निर्मात्यांनी जाहीर केलं असतानाच आता आणखी एक सिनेमा डिजीटलवर रिलीज होण्यासाठी सज्ज झालाय. विद्या बालन स्टारर 'शकुंतला देवी' हा सिनेमा सुद्धा आता ओटीटीवर रिलीज करणार असल्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतलाय.

बर्थडे स्पेशल: माधुरी दीक्षित केवळ नंबर वन अभिनेत्रीच नाही तर एकेकाळची कॉन्ट्रोवर्सी क्वीन होती.

अभिनेत्री विद्या बालनने स्वतः याविषयी माहिती दिली आहे. विद्याने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलंय, 'ही गोष्ट जाहीर करताना मला आनंद होत आहे की तुम्ही लवकरंच शकुंतला देवी तुमच्या आवडत्या लोकांसोबत ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहू शकता. या कठीण काळात आम्ही तुमचं मनोरंजन करण्याासाठी खूपंच उत्सुक आहोत.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Delighted to announce that you will get to see #ShakuntalaDevi very soon on @primevideoin with all your 

A post shared by Vidya Balan (@balanvidya) on

 

कोण होत्या शकुंतला देवी?

शकुंतला देवी एक गणितज्ञ होती. गणितावरच्या तिच्या अभ्यासामुळे तिचं नाव १९८२मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं होतं. त्यांनी अनेक पुस्तकं देखील लिहिली. मात्र त्यांच्या 'द वर्ल्ड ऑफ होमोसेक्युअल्स' या पुस्तकाला भारतात होमो सेक्युलिटीवर आधारित अभ्यासासाठी उत्तम माहीती पुस्तक म्हणून ओळखलं जातं.

जगात शकुंतला देवी यांना 'मानवी कम्प्युटर' अशी ओळख मिळालेली आहे. हा हिंदी सिनेमातला पहिला असा सिनेमा आहे ज्यात दिग्दर्शनापासून ते लेखन, मुख्य भूमिकेपर्यंत महिलांनी काम केलंय.

Vidya balan Starrer Film And Biopic of Shakuntala Devi First ...

'शकुंतला देवी' हा सिनेमा ऍमेझॉन प्राईमवर रिलीज होणार असला तरी अजुन त्याची तारीख जाहीर केलेली नाही. 

after gulabo sitabo vidya balans shakuntala devi to get a digital release  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after gulabo sitabo vidya balans shakuntala devi to get a digital release