इंटिमेट फोटो व्हायरल झाल्यानंतर जॅकलिनचा कल अध्यात्माकडे? Jacqueline Fernandez | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sukesh Chandrashekhar, Jacqueline Fernandez

इंटिमेट फोटो व्हायरल झाल्यानंतर जॅकलिनचा कल अध्यात्माकडे?

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. २०० कोटी रुपये घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबत (Sukesh Chandrasekhar) जॅकलिनचा इंटिमेट फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हायरल फोटोमुळे जॅकलिनला स्पष्टीकरण द्यावं लागलं. दुसरीकडे या प्रकरणात ईडीकडूनही तिची चौकशी सुरू आहे. या सर्व समस्यांच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी जॅकलिन सध्या अध्यात्मिक मार्ग निवडल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती क्षमा आणि हिलिंग या विषयांवरील काही अध्यात्मिक पुस्तकं वाचत असल्याची माहिती एका वेब पोर्टलने दिली आहे.

'जॅकलिनचा अध्यात्माकडे कल वाढला आहे. अध्यात्मिक गोष्टींवर तिचा खूप विश्वास आहे. गेल्या काही दिवसांपासून ती ध्यान, श्वासोच्छवासाचे व्यायाम यांवर अधिक भर देत आहे. तिच्यासाठी हा काळ खूप कठीण आहे. ती लुईस एल हे यांचीही बरीच पुस्तकं वाचत आहे', अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा: 'अशा घटनांना विरोध झालाच पाहिजे'; किरण मानेंच्या समर्थनार्थ उतरले नेटकरी

सुकेशसोबत इंटिमेट फोटो व्हायरल झाल्यानंतर जॅकलिनचं स्पष्टीकरण-

'या देशाने आणि इथल्या जनतेने मला नेहमीच प्रेम आणि सन्मान दिला आहे. यात माध्यमांतील मित्रांचाही समावेश आहे. ज्यांच्याकडून मी खूप काही शिकले. सध्या मी अत्यंत कठीण काळातून जात असून मला खात्री आहे की माझे मित्र आणि चाहते यात माझी मदत करतील. माध्यमांतील मित्रांना मी विनंती करते की त्यांनी माझ्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करणारे फोटो शेअर करू नये', असं तिने सोशल मीडियावर लिहिलं होतं.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये जॅकलिन आणि सुकेश किस करताना दिसत होते. यावेळी जॅकलिनच्या मानेवरील खूणसुद्धा चर्चेचा विषय ठरली. घोटाळेबाज सुकेशने जॅकलिनला कोट्यवधी रुपयांचे भेटवस्तू दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यानंतर ईडीने जॅकलिनची चौकशी सुरू केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top