
The Kerala Story उत्तर प्रदेश मध्ये झालाय टॅक्स फ्री, योगी आदित्यनाथ यांची महत्वपूर्ण घोषणा
The Kerala Story Tax Free in UP news: नुकताच प्रदर्शित झालेला 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट उत्तर प्रदेश सरकार राज्यात टॅक्स फ्री घोषित करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी केली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह लोक भवन येथे आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष स्क्रीनिंगमध्ये हा चित्रपट पाहू शकतील, असे मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाने सांगितले.
(After Madhya Pradesh, UP yogo adityanath declares ‘The Kerala Story’ tax-free)
यूपी भाजपचे सचिव राघवेंद्र मिश्रा यांनी नुकताच हा चित्रपट लखनऊमध्ये १०० विद्यार्थिनींना दाखवला होता. द केरला स्टोरी हा वादग्रस्त चित्रपट ‘टॅक्स ’ बनवणारे उत्तर प्रदेश हे मध्य प्रदेशानंतर दुसरे राज्य ठरले आहे.
“लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकलेल्या मुलींचे आयुष्य कसे उद्ध्वस्त होते हे चित्रपटात दाखवले आहे. यातून दहशतवादाच्या रचनेचा पर्दाफाश होतो,” असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.
आता UP मध्ये सिनेमा टॅक्स फ्री केल्याने जास्तीत जास्त प्रेक्षक हा सिनेमा बघू शकतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्रात सुद्धा द केरला स्टोरीला सपोर्ट करण्यात आलाय. पुण्याच्या भोरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येतं,द केरळा स्टोरीचं चित्रपटाच्या समर्थनाचे लावले बॅनर लावले आहेत.
भोर शहरात ठिकठिकाणी बॅनर लावत, चित्रपट बघण्याचं नागरिकांना केलं आवाहन करण्यात आलंय.
"एक वेळ मुलींना केरळ दाखवले नाही तरी चालेल, पण द केरळा स्टोरी अवश्य दाखवा, सर्व माताभगिनींनी जवळच्या चित्रपटगृहात जाऊन अवश्य चित्रपट पहावा" अशा आशयाचे लावले बॅनर लावण्यात आले आहेत.
याशिवाय देशात ठिकठिकाणी 'द केरळ स्टोरी'वर बंदी घालण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत असला तरी बहुतांश मंडळींचा या चित्रपटाला विरोध आहे.
तर तामिळनाडूमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. याशिवाय ममता बॅनर्जींनी आदेश दिल्याने पश्चिम बंगालमध्ये सुद्धा 'द केरळ स्टोरी' वर बंदी घालण्यात आली आहे.