
Haardik Joshi : लग्नानंतर हार्दिक जोशीची पुन्हा एकदा मालिकेत एन्ट्री, या मालिकेत झळकणार
Hardeek Joshi - Akshaya Deodhar News: हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या दोघांनी डिसेंबर २०२२ ला एकमेकांसोबत थाटामाटात लग्न केलं. हार्दिक आणि अक्षया या दोघांच्या जोडीची लग्नानंतर सुद्धा चर्चा आहे.
हार्दिक आणि अक्षया या दोघांच्या नवीन प्रोजेक्ट्सची त्यांचे फॅन्स वाट बघत होते. आता हार्दिकचा लग्नानंतर नवीन प्रोजेक्ट येतोय. हार्दिक आता एका नव्या मालिकेतून आपल्या भेटीला येतोय.
(After marriage, Hardik Joshi's entry in the marathi serial sundari)
सन मराठीवरील सुंदरी या मालिकेतून हार्दिक जोशी झळकणार आहे. सुटाबुटात असलेल्या हार्दिकच्या डोळ्यांवर गॉगल आहे. सुंदरीच्या ट्रेनिंगसाठी आयएएस अजिंक्य शिंदेची एन्ट्री होणार आहे.
अजिंक्य शिंदेंच्या भूमिकेत हार्दिक जोशी रफ अँड टफ अंदाजात दिसतोय. 'सुंदरी' मालिका सन मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता सुरु आहे.
'तुझ्यात जीव रंगला'फेम राणादा आणि पाठक बाई म्हणजेच मराठीतील प्रसिद्ध कलाकार हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर शुक्रवारी 2 डिसेंबर रोजी विवाह बंधनात अकडले. पुण्यामध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला.
संगीत, मेहंदी, हळदी आणि लग्न अशा खास थाटात या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.
हार्दिक अक्षया यांनी बरीच वर्षे झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत एकत्र काम केले आहे. त्यांच्यात घट्ट मैत्री होती. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 3 मे 2022 रोजी त्यांनी अत्यंत दिमाखात आपला साखरपुडा उरकला. त्यानंतर सर्वांना उत्सुकता होती ते त्यांच्या लग्नाची. अखेर साखरपुड्यानंतर पाच महिन्यांनी डिसेंबर मध्ये ते लग्न बंधनात अडकले.
सध्या अक्षयाचा कोणताही नवीन प्रोजेक्ट येत नाहीये. पण हार्दिक मात्र सुंदरी मालिकेच्या माध्यमातून लग्नानंतर पुन्हा एकदा मराठी मालिका विश्वात कमबॅक करतोय. लग्नाआधी हार्दिक अभिनेत्री अमृता पवार सोबत तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत झळकला होता.