अभिनेत्री मुमताजचं निधन? पंजाबच्या मंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर सोशल मिडियावर अफवांच पीक..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

मुमताज यांच्या निधनाची बातमी सोशल मिडियावर वा-यासारखी पसरत आहे. यावेळी पंजाबच्या एका मंत्र्यांनी मुमताजला श्रद्धांजली वाहिली आहे.

मुंबई- अभिनेत्री मुमताज पुन्हा एकदा चुकीच्या कारणामुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षासारखीच या वर्षीची मुमताज यांच्या निधनाची बातमी सोशल मिडियावर वा-यासारखी पसरत आहे. यावेळी पंजाबच्या एका मंत्र्यांनी मुमताजला श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र एका वेबसाईटने मुमताज यांच्या कुटुंबाशी संपर्क केला असता त्या एकदम व्यवस्थित असल्याचं समजलंय.

हे ही वाचा: बाहुबली फेम राणा दग्गुबतीचा मिहीकासोबत पार पडला साखरपुडा

गेल्या वर्षी याच महिन्यात त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती. गेल्या वर्षी अभिनेत्री मुमताज यांच्या निधनाच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का दिला होता. ही अफवा मे महिन्यातंच पसरली होती. आणि आता यावर्षी देखील पुन्हा याच मे महिन्यात मुमताज यांच्या निधनाच्या अफवा सोशल मिडियावर वा-यासारख्या पसरत आहेत. मुख्य म्हणजे हा गैरसमज पंजाबचे क्रिडा मंत्री राणा गुरमीत एस सोढी यांच्या ट्वीटनंतर पसरला. 

सोढी यांच ट्वीट झालं व्हायरल

सोढी यांनी ट्वीट केलं की मुमताजजी आता आपल्यात राहिल्या नाहीत. हा माझ्यासाठी एक मोठा धक्का आहे. मी माझी अत्यंत जवळची मैत्रीण गमावली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची लंडनमध्ये भेट झाली होती. नेहमीच आयुष्याने भरलेली. तिचं जाणं ही माझी वैयक्तिक हानी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देओ. तुम्ही निघून गेलात मात्र तुम्हाला कोणीही विसरु शकत नाही. 

punjab minister tweets mumtaz death news: पंजाब के ...

मुमताजच्या निधनावर कुटुंबाचं स्पष्टीकरण

हे ट्वीट सोशल मिडियावर चांगलंच व्हायरल होतंय. फराह खान अली यांनी मुमताजच्या मुलीसोबत चर्चा केली आणि हे सांगितलं की त्या एकदम व्यवस्थित आहेत. तर मिलाप जवेरी यांनी देखील मुमताज यांच्या निधनाच्या अफवाच असल्याचं म्हटलंय. 

फराह खान अली आणि मिलाप जवेरी हे मुमताजच्या मुलीचे सासरचे नातेवाईक आहेत.   

after punjab ministers tribute tweet family denies death news of actress mumtaz  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after punjab ministers tribute tweet family denies death news of actress mumtaz