Vilasrao Deshmukh Birthday: निळू फुलेंचा 'तो' शब्द आणि विलासरावांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सूत्रच हलवली.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

after refused maharashtra bhushan award nilu phule suggest abhay bang name for this award and vilasrao deshmukh agreed

Vilasrao Deshmukh Birthday: निळू फुलेंचा 'तो' शब्द आणि विलासरावांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सूत्रच हलवली..

Vilasrao Deshmukh Birthday: एक कलासक्त नेता म्हणून ज्यांची ओळख आजही सांगितली जाते ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंतग कॉँग्रेस नेते विलासराव देशमुख.

विलासरावांनी राजकीय कारकीर्द जितकी मोठी तितकाच त्यांचा कलेचा व्यासंग होता. त्यांचे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कलेवर भरभरून प्रेम केले. अगदी जेव्हा जेव्हा कलाकारांवर संकट ओढवले तेव्हा विलासराव पुढे होऊन मदतीला आले.

असाच एक त्यांचा किस्सा आहे, ज्यातून ते कलाकारांच्या शब्दाला किती मान देतात हे कळतं. हा किस्सा आहे विलासराव देशमुख आणि अभिनेते निळू फुले यांच्या मधला. निळू फुले यांच्या एका शब्दाखातर विलासरावांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कारात मोठा बदल केला होता..

आज विलासराव यांचा वाढदिवस, त्यानिमित्ताने जाणून घेऊया ही खास बात..

(after refused maharashtra bhushan award nilu phule suggest abhay bang name for this award and vilasrao deshmukh agreed)

काही दिवसांपूर्वीच 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारावरून बराच गदारोळ झाला. यावेळी इतिहास अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी हा किस्सा शेयर केला होता, त्यांनी लिहिलं होतं की..

''२००४ साल असावे. मी निळुभाऊंकडे बसलो अस्ताना मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा निळू फुले यांना फोन आला. ते म्हणाले, आमच्या शासनाने २००३ या वर्षीच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी तुमची निवड केलेली आहे.तुमची संमती हवी.''

''निळूभाऊंनी त्यांचे आभार मानले आणि या पुरस्काराला पात्र ठरावा असा मी कोणताही पराक्रम केलेला नाही. मी एक व्यावसायिक अभिनेता आहे. पोटापाण्याची सोय म्हणून अभिनय करतो. त्याचे वट्ट मोजून पैसे घेतो. यात समाजासाठी, राज्यासाठी मी काहीही केलेले नाही.''

''मुळात तुम्ही आम्हा व्यावसायिक लोकांना हा पुरस्कार देणेच चूक आहे, असे भाऊंनी सीएमना सुनावले.''

''पुढे निळू फुले म्हणाले, तुम्हाला हा पुरस्कार द्यायचाच असला तर डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांना द्या. त्यांनी बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी भागात, गडचिरोलीला सर्चच्या माध्यमातून मोठे काम केलेले आहे." भाऊंची ही शिफारस विलासरावांनी ताबडतोब मान्य केली. आणि २००३ सालचा महाराष्ट्र भूषण डॉ. बंग पतीपत्नी यांना दिला गेला.''

पण या सगळ्यात कौतुक आहे ते विलासरावांच्या कार्याचं. यासंदर्भात निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले म्हणतात, "या सगळ्यामधे कौतुक माझ्या बाबांबरोबर विलासरावांचं पण वाटतं की त्यांनी बाबांचं ऐकलं.... किती मोठेपण दोघांचं आणि विश्वासपण!"

मध्यंतरी हा किस्सा बराच व्हायरल झाला होता.