Googleवर हळद सर्च करताच पुढे आला तो बेबोचा फोटो,काय आहे भानगड ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

After searching turmeric face pack kareena kapoor photo was on top on google

Googleवर हळद सर्च करताच पुढे आला तो बेबोचा फोटो,काय आहे भानगड ?

बी टाऊनमधली टॉप अभिनेत्री करीना कपूरची चर्चा सगळीकडेच असते. मात्र गुगलवर हळदीचा विषय सर्च करावा आणि करीनाचा फोटो यावा ही भानगड नेमकी काय आहे? करीनाबाबतचं हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. मात्र हळदीबाबत नेमकं काय सर्च केल्यावर करीनाचा फोटो येतो त्याचा रंजक किस्सा आपण जाणून घेऊया. (After searching turmeric face pack kareena kapoor photo was on top on google)

खरं तर हे प्रकरण २०२० मध्ये खूप चर्चेत आलं होतं. गूगलवर जेव्हा टर्मरिक फॉर स्किन सर्च केल्या गेलं होतं. तेव्हा सगळ्यात टॉपला करीनाचा फोटो गूगलला दिसलेला. या फोटोमध्ये करीनाच्या चेहऱ्यावर पिवळ्या रंगाचा पॅक लावलेला होता. करीनाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला होता.

एका मुलाखतीमध्ये करीनाने सांगितले होते की, ती स्किनसाठी केमिलयुक्त प्रोडक्ट न लावता किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या घरघती पदार्थांनी ती तिच्या त्वचेची निगा राखते. तिच्या वायरल झालेल्या फोटोमध्ये तिने जो फेस पॅक लावलाय त्यामध्ये चंदन, दोन ड्रॉप विटॅमिन ई आणि एक चिमुट हळद यांचं मिश्रण होतं.

करीनाने प्रेग्नंसीदरम्यान लिहीलेल्या तिच्या प्रेग्नंसी बायबल या पुस्तकात प्रेग्नंसीदरम्यान तिने त्वचेची काळजी कशी घेतली याबाबत लिहीलंय. करीना पपई आणि दही, चण्याच्या डाळीचं पिठ यांचे देखील फेस पॅक बनवून चेहऱ्याला लावत असते. महिन्यातून दोनदा करीना असे फेस पॅक बनवून लावत असते.

Web Title: After Searching Turmeric Face Pack Google Showed Kareena Kapoor Photo On Top Read Suspense

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..