esakal | दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या ते पुण्यात आज दुकाने बंद, ठळक बातम्या एका क्लिकवर 
sakal

बोलून बातमी शोधा

 afternoon news state board ssc hsc exam postponed may end and june federation open shops pune 1 day

हरिद्वारमध्ये महाकुंभ सुरु असून आज दुसरं शाही स्नान होत आहे. यामध्ये आखाड्यामधील साधु संत स्नान करत आहेत.

दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या ते पुण्यात आज दुकाने बंद, ठळक बातम्या एका क्लिकवर 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

युरोपियन मेडिसिन एजन्सीच्या सुरक्षा समितीने एस्ट्राझेनकाच्या कोरोना लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याबाबत आता नवीन इशारा दिला आहे. एजन्सीने एका रिपोर्टमध्ये म्हटलं की, एस्ट्राझेनकाची लस घेणाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी लस घेतल्यानंतर कमी प्लेटलेट्सच्या रक्ताच्या गुठळ्यां प्रकरणांकडे गांभीर्याने पाहायला हवं.  देशात कोरोनाची दुसरी लाट असतानाही अनेक ठिकाणी लोकांची गर्दी आणि मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन होताना दिसत आहे. हरिद्वारमध्ये महाकुंभ सुरु असून आज दुसरं शाही स्नान होत आहे. यामध्ये आखाड्यामधील साधु संत स्नान करत आहेत. देशभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. आता सर्वोच्च न्यायालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयातील अनेक कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये रविवारी (ता.११) दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज (ता. १२) त्यांच्या पित्ताशयावर यशस्वी लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. देशात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. त्यात बहुतांश रुग्ण संख्या ही महाराष्ट्रातील आहे. राज्यात कोरोना संसर्ग वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. लवकरच राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाउन लावण्याचा विचारही सरकारकडून केला जात आहे. 'सोमवारी व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करू'', असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते तसेच पालकमंत्री अजित पवार हे देखील याबाबत ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. 


ग्लोबल - युरोपियन मेडिसिन एजन्सीच्या सुरक्षा समितीने एस्ट्राझेनकाच्या कोरोना लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याबाबत आता नवीन इशारा दिला आहे. - वाचा सविस्तर 

देश - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन होत असून पोलिस अधिकारीसुद्धा हतबल झाले आहेत.- वाचा सविस्तर 

देश - सर्वोच्च न्यायालयाची सर्व खंडपीठे आपल्या निर्धारित वेळेपेक्षा एक तास उशिराने सुरु होणार आहेत.- वाचा सविस्तर 

देश - देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक कोटी ३५ लाख २७ हजार ७१७ इतकी झाली आहे. तर एक लाख ७० हजार १७९ जणांचा मृत्यू झाला आहे.- वाचा सविस्तर 

महाराष्ट्र - शरद पवार यांच्यावरील दुसरी शस्त्रक्रियाही यशस्वी - वाचा सविस्तर 

महाराष्ट्र - तुम्हाला माहितीय का? 'या' गोष्टींचा शोध चुकून लागलाय, ज्या आजही आपण वापरतोय - वाचा सविस्तर 

मुंबई - सचिन वाझेचे सहकारी पोलिस अधिकारी रियाझ काझी याला रविवारी NIAने अटक केली. आज रियाझ काझीला सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे.- वाचा सविस्तर 

मुंबई - मुंबईत सलग तीन दिवस कोरोना सक्रिय रुग्ण ९० हजारांपार- वाचा सविस्तर 

मुंबई - "गिर गया तो भी... "; भाजपचा ठाकरे सरकारला टोला - वाचा सविस्तर 

पुणे - पुणे जिल्ह्यातील २२९ गावांत कोरोनाला No Entry - वाचा सविस्तर 

पुणे - पुण्यात आज दुकाने बंद; व्यापारी महासंघ आणखी 1 दिवस वाट पाहणार - वाचा सविस्तर 

महाराष्ट्र - मोठी बातमी - दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; वाचा कधी होणार? -

मनोरंजन - अखेर एकता कपूरच्या बालाजी अल्टनं मागितली माफी; किस्सा पोस्टर चोरीचा - वाचा सविस्तर 


 

loading image