Girish Oak: अग्गंबाई सासूबाई फेम 'अभिजीत राजे' वापरलेली बुलेट विकणार, समोर आलं मोठं कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girish Oak: अग्गंबाई सासूबाई फेम 'अभिजीत राजे' वापरलेली बुलेट विकणार, समोर आलं मोठं कारण

Girish Oak: अग्गंबाई सासूबाई फेम 'अभिजीत राजे' वापरलेली बुलेट विकणार, समोर आलं मोठं कारण

Girish Oak Bullet News: अग्गबाई सासूबाई मालिका झी मराठीवरची चर्चेत गाजलेली मालिका. मालिका जरी संपली असली तरीही लोकांच्या स्मरणात ही मालिका कायम आहे.

मालिकेतील आसावरी, बबड्या, शुभ्रा, अभिजित राजे अशी प्रमुख व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या हृदयाच्या जवळ आहेत.

आता या मालिकेविषयी एक मोठी बातमी समोर आलीय. मालिकेतील अभिजित राजे म्हणजेच डॉ . गिरीश ओक यांच्याविषयी एक मोठी बातमी समोर आलीय.

(Aggabai Sasubai fame 'Abhijit Raje' aka girish oak will sell used bullets, a big reason has come to light)

गिरीश ओक यांनी त्यांची मालिकेत वापरलेली बुलेट विकायला काढलीय. गिरीश ओक यांनी अग्गबाई सासूबाई मालिकेत शेफ अभिजित राजेंची भूमिका साकारली होती.

बुलेटवर बसून अभिजित राजे मालिकेत हिंडताना दिसत आहेत. मालिकेतली अभिजित राजेंची बुलेट आणि त्यांनी मारलेली स्टाईल चर्चेत राहिली. आता हीच बुलेट अभिजित राजे म्हणजेच डॉ. गिरीश ओक यांनी विकायला काढलीय.

गिरीश ओक सोशल मीडियावर पोस्ट केलीय. त्यात लिहिलंय की.. मी "अग्गंबाई सासूबाई" मालिकेत वापरायचो ती हीच माझी लाडकी फटफटी Royalenfield 350 classic.

व्यवस्थित चालू आहे मी सध्या वापरतोच. पण ती मला आता विकायचिये (शब्द वापरताना जरा त्रास होतोय) तशी काय मी ती एक्सचेंज करू शकतो पण कोणा "शेफ अभिजीत राजेच्या" चाहत्याला हवी असेल तर बघावं.

नंतर दोघांनाही हळहळ वाटायला नको.तसं काही असल्यास लवकर ९८२०२९८१८० ह्या क्रमांकावर संपर्क करा. गिरीश ओक यांनी पोस्ट करताच अनेकांनी ही बुलेट घ्यायला उत्सुकता दर्शवलीय.

डॉ. गिरीश ओक यांच्या या पोस्टखाली.. एकाने कमेंट केलीय, गाडी छान मेंटेन केली आहे आपण....मला वाटते वयाप्रमाणे गाडी जड वाटते....मी माझ्या अनुभवाने सागतो आहे.... याशिवाय दुसऱ्या एका युजरने..

माणूस काय वस्तू काय, भावना गुंतलेल्या असतातंच, असणारंच.आमच्याकडे जुनी गाडी विकली तेव्हा खूपं दिवस मी बेचैनंच होते.लक्ष्मी असते कोणतीही पहिली वस्तू ही!ती खरेदी करतांना केलेल्या संघर्षाची आपणंच कल्पना करु शकतो! अशी कमेंट केलीय.

खूप जणांनी गाडीची किंमत देखील विचारलीय. गिरीश ओक सध्या ३८ कृष्ण विला नाटकात अभिनय करत आहेत.