esakal | Video : बबड्या, सासूबाईंना विसरा; आता येतेय 'अग्गंबाई सूनबाई'
sakal

बोलून बातमी शोधा

aggabai sunbai

आता या कथानकात बरेच बदल होणार असून एका नव्या रुपात नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Video : बबड्या, सासूबाईंना विसरा; आता येतेय 'अग्गंबाई सूनबाई'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन

अनोख्या कथानकामुळे 'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका अल्पावधीतच चर्चेत आली. निवेदिता सराफ, तेजश्री प्रधान, गिरीश ओक, आशुतोष पत्की या सर्व कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील बबड्या हे पात्र तर चांगलंच गाजलं. आता या कथानकात बरेच बदल होणार असून एका नव्या रुपात नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं नाव 'अग्गंबाई सूनबाई' असं असून त्याचा पहिला प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

या प्रोमोनुसार कुलकर्णी कुटुंबात बरेच बदल दिसून येतात. आता आसावरी मोठ्या कंपनीची मालकीण झाली आहे. तिचं रुप आणि तिचा स्वभाव पूर्णपणे बदललेला पाहायला मिळतोय. एरव्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी घाबरणारी आसावरी आता पूर्ण आत्मविश्वासाने ऑफिसचं काम सांभाळते आहे. तर सोहम तिच्या हाताखाली काम करतोय. शुभ्रा आता एका मुलाची आई असून तिने बबडूची अर्थात तिच्या मुलाची जबाबदारी सांभाळत नव्या संसाराला सुरुवात केली आहे. 

हेही वाचा : आदेश बांदेकरांचा मुलगा सोहम बांदेकरचं अभिनय क्षेत्रात पदार्पण

हेही वाचा : झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

कुलकर्ण्यांच्या या नवीन कुटुंबात शुभ्राला संसाराच्या काही टीप्स देत आसावरी शुभ्राला स्वतंत्र करण्याच्या मार्गावर आहे. यात आसावरी आणि अभिजीत यांच्या भूमिका त्याच असून शुभ्राची भूमिका बदलली आहे. निवेदिता सराफ व गिरीश ओक यांच्यासोबत आता तेजश्री प्रधान दिसणार नाही. त्याचप्रमाणे बबड्याच्या भूमिकेत आशुतोष पत्की दिसणार की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ही नवीन मालिका येत्या १५ मार्चपासून सुरू होणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

loading image