
Abhishek Bachchan नं केला 'पोन्नियन सेल्व्हन 2' चा रिव्ह्यू अन् भडकला ऐश्वर्याचा चाहता.. काय घडलंय नेमकं?
Ponniyin Selvan 2: ऐश्वर्या राय अभिनित 'पोन्नियन सेल्व्हन २' सिनेमा पाहिल्यानंतर अभिषेक बच्चननं या सिनेमाचा रिव्ह्यू मायक्रोब्लॉगिंग साइट ट्वीटरवर शेअर केला आहे. मणिरत्नम दिग्दर्शित या सिनेमात ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत आहे. जेव्हा अभिषेक आपल्या बायकोच्या कामाची प्रशंसा करत होता तेव्हा त्याला एका चाहत्यानं सल्ला देत म्हटलं की तिला सिनेमे साइन करू देत आणि मुलीची काळजी तुम्ही घ्या.
अनेकदा अशा ट्वीट्सकडे दुर्लक्ष करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिषेक बच्चननं या ट्वीटवर उत्तर देण्याचा निर्णय घेतला. चला जाणून घ्या पूर्ण प्रकरण..(Aishwarya Rai bachchan fan got furious when abhishek bachchan tweets about ponniyin selvan 2)
अभिषेक बच्चन ऐश्वर्याची प्रशंसा करत ट्वीट केलं होतं. त्यानं लिहिलं होतं की,'' PS2 हा कमाल सिनेमा आहे. याचं वर्णन मी शब्दात करूच शकत नाही. हा सिनेमा पाहून मला काहीतरी अद्भूत पाहिल्यासारखं वाटत आहे. संपूर्ण टीमनं शानदार काम केलं आहे. आणि मला माझ्या पत्नीवर गर्व आहे. कदाचित हे तिचं आतापर्यंतच सगळ्यात दमदार काम आहे''.
अभिषेकच्या या ट्वीटवर नेटकऱ्यानं उत्तर दिलं की -'तुम्हाला तुमच्या पत्नीचा अभिमान असलाच पाहिजे. आता तिला आणखी सिनेमे साइन करू देत आणि आराध्याची काळजी तुम्ही घ्या'.
या नेटकऱ्याच्या ट्वीटवर उत्तर देताना अभिषेक बच्चननं लिहिलं आहे की,''साइन करायला द्या म्हणजे? सर तिला कोणतीही गोष्ट करण्यासाठी परवानगीची गरज नाही. खासकरुन अशा गोष्टीसाठी जिच्यावर तिचं खूप प्रेम आहे''.अभिषेकनं हे उत्तर देत लोकांचं मन जिंकलं आहे.
एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'काय मस्त बोललात सर..आम्हाला तुम्हा दोघांना एकत्र पुन्हा सिनेमात पहायचं आहे,आम्ही त्यासाठी उत्सुक आहोत'. माहितीसाठी इथं सांगतो की अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र 'रावण','उमराव जान','धूम २','गुरू' या सिनेमात दिसले होते.