चाहत्यांनी ऐश्वर्याला दिल्या शुभेच्छा

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

मुंबई - आपल्या सौंदर्याने सगळ्यांनाच भुरळ घालणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने आज 44 व्या वर्षात पदार्पण केले. सोशल मिडियावर तिला बॉलिवूडमधील कलाकारंनी आणि तिच्या चाहत्यांनी शुभच्छा दिल्या आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी ऐश्वर्याने आपल्या कुटुंबासमवेतच वाढदिवस साजरा केला. 

'मिस वर्ल्ड' खिताब पटकावणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचे बालपण मुंबईतच गेले. माटुंग्याच्या रूपारेल कॉलेजमध्ये तिने आर्किटेक्चर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. परंतु, त्याचवेळी तिला मॉडेलिंगच्या संधी मिळत गेल्या. याबरोबरच तिने मिस इंडिया स्पर्धेतभाग घेतला. या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावल्यावर तिने मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतला तेव्हा जगतसुंदरीचा मुकूटही तिच्या डोक्यावर चढला. त्यानंतर मणिरत्नम यांच्या 'इरूवर' चित्रपटातून ऐश्वर्याच्या रूपेरी कारकीर्दीस सुरूवात झाली ते आजर्यंत ती चहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

Web Title: Aishwarya Rai Bachchan turns 43