बत्तीस वर्षांची व्यक्ती म्हणते, ऐश्वर्या राय तर माझी आई...

वृत्तसंस्था
बुधवार, 15 जानेवारी 2020

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही माझी आई आहे, असा दावा एका बत्तीस वर्षाच्या व्यक्तीने केला आहे. शिवाय, त्या व्यक्तीने प्रसारमाध्यमांना मुलाखतीसुद्धा दिल्या आहेत.

बंगळूरः अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही माझी आई आहे, असा दावा एका बत्तीस वर्षाच्या व्यक्तीने केला आहे. शिवाय, त्या व्यक्तीने प्रसारमाध्यमांना मुलाखतीसुद्धा दिल्या आहेत.

अनुराधा पौडवाल तर माझी आई म्हणून मला...

Aishwarya Rai, Sangeeth Kumar

काही दिवसांपूर्वी एका महिलेने गायिका अनुराधा पौडवाल या आपली आई असल्याचा दावा केला होता. असाच दावा संगीत कुमारने (वय 32) केला आहे. शिवाय, आपला जन्म 1988 रोजी झाला असल्याचे म्हटले आहे. 1988 साली ऐश्वर्या राय केवळ १५ वर्षांची होती.

फरहानच्या दुसऱ्या लग्नावर वडिल जावेद अख्तर म्हणाले...

Aishwarya Rai is my mom  claims Mangaluru youth

एका मुलाखतीमध्ये बोलताना संगीत कुमार म्हणाला, 'ऐश्वर्या राय माझी आई आहे. माझा जन्म 1988 साली आईव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे (इन विट्रो फर्टिलायझेशनद्वारे) लंडनमध्ये झाला आहे. लहानपणी आजी-आजोबांनी सांभाळले आहे. शिवाय, ऐश्वर्या रायच्या पालकांनी मी दोन वर्षांचा होईपर्यंत संभाळले. त्यानंतर माझे वडील वेदीवेलू रेड्डी मला विशाखापट्टनमला घेऊन गेले. माझ्या नातेवाईकांनी माझ्या जन्माचे सर्व पुरावे नष्ट केले आहेत. आज ती कागदपत्रे उपलब्ध असती तर माझे म्हणणे मी ठापपणे मांडू शकलो असतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aishwarya rai is my mom claims mangaluru youth