'सोनेरी' ऐश्वर्या झळकली 'कान्स'च्या रेड कार्पेटवर!

Aishwarya Rai
Aishwarya Rai

कान्स : कान्स फिल्म फेस्टिव्हल म्हणलं की, पहिली डोळ्यासमोर येते ती ऐश्वर्या! कान्स सुरू झाल्यापासून, ती कधी रेड कार्पेटवर अवतरणार आणि तिचा लूक कसा असणार याकडे तमाम जगाचे लक्ष लागलेले असते. त्याप्रमाणे काल ऐश्वर्या राय-बच्चन कान्सच्या रेड कार्पेटवर आली आणि सुरू झाला, तो कॅमेराचा क्लिक्लिकाट!

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

जगप्रसिद्ध अशा कान्स फिल्म फेस्टिव्हल 2019च्या सहाव्या दिवशी रेड कार्पेटवर अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन झळकली. सर्वात पहिले लक्ष गेले ते तिच्या डोळ्यांकडे... डोळ्यांचा सुंदर आणि साधा मेकअप, काळेभोर केस मोकळे आणि मागे सोडलेले आणि जीन डिझायनर लुईस साबजी यांनी खास तयार केलेला गोल्डन रंगाचा क्रोम गाऊन अशा पेहरावात ऐश्वर्या रेड कार्पेटवर आली. तिने छायाचित्रकारांना पोझ दिली आणि क्षणार्धात तिचे हजारो फोटो क्लिक झाले. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

यंदाच्या कान्समध्ये ऐश्वर्याची मुलगी आराध्याही झळकली. तिनेही लिंबू कलरचा गाऊन घातला होता. यामुळे दोघी मायलेकींची जगभरात चर्चा झाली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My Sunshine ForeverLOVE YOU

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

मेकअपसाठी ऐश्वर्याने लोरिअल पॅरिसच्या उत्पादनांचा वापर केला होता. मस्कारा, आयशॅडोज्, लिपस्टीक, ब्लेंडेड फाऊंडेशन ही सर्व उत्पादने लोरिअल पॅरिसची वापरण्यात आली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com