
कोरोनामुळे गेल्या दहा महिन्यांपासून घरात लॉकडाऊन असणारी ऐश्वर्या, अभिषेक बच्चन आणि त्यांची मुलगी भटकंतीसाठी घराबाहेर पडले आहेत. हैद्राबादमधील त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.
मुंबई - बॉलीवूडची लावण्यसम्राज्ञी म्हणून ऐश्वर्याला सारं जग ओळखते. तिनं आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलं आहे. कोरोनामुळे गेल्या दहा महिन्यांपासून घरात लॉकडाऊन असणारी ऐश्वर्या, अभिषेक बच्चन आणि त्यांची मुलगी भटकंतीसाठी घराबाहेर पडले आहेत. हैद्राबादमधील त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी त्याला मोठ्या प्रमाणावर कमेंट दिल्या आहेत. तर काहींनी गंमतीशीर इमोजीही त्यांना शेयर केले आहेत.
कोरोनामुळे मागील वर्षभरापासून देशाचे आरोग्य धोक्यात आले आहे. सरकारने कोरोनाचा फैलाव आणखी मोठ्या प्रमाणावर होऊ नये यासाठी काही धोरणात्मक पाउले उचलली होती. सुरक्षेच्या कारणास्तव देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाल्याचे दिसून आले आहे. अनेकांचे रोजगार गेले. हजारोंवर बेकारीची कु-हाड कोसळली होती. कोरोनापासून बॉलीवूडचीही सुटका झाली नाही. कित्येक चित्रपटांचे चित्रिकरण थांबले, प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या. यामुळे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांना मोठ्या आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागले आहे.
शनाया ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका सोडणार ?
अनेक कलाकारांनी सुरक्षेच्या कारणास्तव घरातून बाहेर पडण्याचे टाळले होते. बच्चन फॅमिलीमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिध्द झाले होते. त्यामुळे त्या परिवारातील सर्वच सदस्यांना स्वतंत्रपणे क्वोरांनटाईन करण्यात आले होते. आता कुठे परिस्थिती निवळताना दिसत आहे. त्यानंतर तब्बल १० महिन्यांनी ऐश्वर्या आपल्या फॅमिलीसोबत घराबाहेर पडली आहे. हैद्राबादमध्ये अभिषेक, आराध्या आणि ऐश्वर्या एकत्र असल्याचे दिसून आले आहे. मार्चमध्ये देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्याला नऊ महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे.
किती मुर्ख आहे मी,हो की नाही? कंगनानं उर्मिला मातोंडकर यांना सुनावलं
ऐश्वर्यानं सोशल मीडियावर जे फोटो शेयर केले आहेत त्यात तिनं ब्लॅक कलरचा लेगिन, कोट, आणि सन ग्लासेस अशाप्रकारचा लूक केला आहे. तिघांनी मास्कही घातला आहे. अशी चर्चा आहे की, ऐश्वर्या ही तिच्या आगामी चित्रपटासाठी हैद्राबाद मध्ये आली होती. प्रसिध्द दिग्दर्शक मणिरत्नम यांचा पोनियन सेलवान नावाचा हा चित्रपट आहे. लॉकडाऊनच्या काळात ऐश्वर्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. ती सतत फोटो, व्हिडिओ इंस्टावर अपलोड करत होती. त्यालाही चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचे पाहवयास मिळाले.
'टोमणे मारल्याशिवाय जमत नव्हते, दोन वेळच्या जेवणाची होती चिंता'
जुलै मध्ये अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. या चौघांनाही मुंबईतील नानावटी रुग्णालयात ठेवण्यात आले होते. त्यात आराध्याची टेस्ट निगेटिव्ह आली होती.
'मिशन मजनू' आहे तरी काय; सिद्धार्थ आणि रश्मिकाचा नवा चित्रपट