ऐश्‍वर्याचा कान्स लूक 

वृत्तसंस्था
सोमवार, 22 मे 2017

बॉलिवूडच्या अभिनेत्री नेहमीच आपल्या सगळ्यात हटके लूकने हॉलिवूडच्या फिल्म फेस्टिव्हल्स किंवा पुरस्कार सोहळ्यांमध्ये चमकण्याचा प्रयत्न करतात.

बॉलिवूडच्या प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, ऐश्‍वर्या राय या अभिनेत्री सध्या हॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरल्या आहेत; पण फक्त त्याच नाहीत, तर त्यांनी परिधान केलेले डिझायनर ड्रेसेसही सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. या त्यांच्या डिझायनर ड्रेसेसची कधी वाहवा होते, तर कधी टीका; पण भारतीय स्टाईल आणि परदेशातील स्टाईल वेगवेगळी असल्याने त्यांच्या देशात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी या अभिनेत्रींनाही कंबर कसावी लागते.

कान्स फेस्टिव्हल सध्या सुरू आहे. या फेस्टिव्हलमध्ये दीपिका पदुकोण, सोनम कपूर, मल्लिका शेरावत, नंदिता दास, श्रृती हसन आणि मिस वर्ल्ड ऐश्‍वर्या राय सामील झाल्या आहेत. नुकतीच ऐश्‍वर्याने कान्समध्ये दुसऱ्यांदा हजेरी लावली. या वेळी ऐश्‍वर्या रायने आपल्या लूकने सगळ्यांनाच मोहून टाकले. नुकत्याच पार पडलेल्या मेट गाला फेस्टिव्हलमध्ये प्रियांका चोप्राच्या लांबलचक ट्रेंच कोटची चर्चा झाली होती. तर आता ऐश्‍वर्या रायच्या लाल गाऊनचीच चर्चा आहे. ऐश्‍वर्यानेही राल्फ ऍण्ड रसोने डिझाइन केलेला लांबलचक लाल रंगाचा गाऊन परिधान केला होता.

खरं तर सेलिब्रेटिजना रेड कार्पेटवर लाल रंगाचे कपडे घालण्यावर निर्बंध आहे; पण ऐश्‍वर्याने कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता आपल्या हॉट लूकने अनेकांना मोहून टाकले. ऐश्‍वर्याच्या या फ्रिलवाल्या गाऊनबरोबरच तिने त्याला साजेसे रूबी रंगाचे कानातले घातले होते. तसाच मेकअपही केला होता. ऐश्‍वर्या कान्समध्ये लॉरिअल पॅरिस या ब्रॅण्डचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उपस्थित आहे. तिचा देवदास हा चित्रपट तब्बल 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा कान्समध्ये दाखविण्यात येणार आहे. ऐश्‍वर्याचा हा सोळावा कान्स फिल्म फेस्टिव्हल आहे. 

Web Title: Aishwarya's Cannes look