esakal | प्रेक्षकांसाठी अजय-अतुल, आनंद-आदर्श शिंदेंच्या गाण्यांचा खास नजराणा
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेक्षकांसाठी अजय-अतुल, आनंद-आदर्श शिंदेंच्या गाण्यांचा खास नजराणा

प्रेक्षकांसाठी अजय-अतुल, आनंद-आदर्श शिंदेंच्या गाण्यांचा खास नजराणा

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात घरोघरी गणरायाचं आगमन झालं. गणरायाचं आगमन होताच विधीवर प्रतिष्ठापना करण्यात आली. आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र मंगलमय आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदाही कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१ Ganeshotsav 2021 या गणपती विशेष कार्यक्रमाची सध्या कमालीची उत्सुकता आहे. प्रवाह कुटुंबाने एकत्र येऊन यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात साजरा केलाय. त्यामुळे गणेशोत्सवाची रंगत द्विगुणीत होणार यात शंका नाही.

ढोल-ताश्यांच्या गजरात बाप्पाचं स्वागत करण्यापासून ते अगदी आरती, गणेशजन्माची कथा, बाप्पाची गाणी असं सगळं अगदी जल्लोषात पार पडणार आहे. विशेष म्हणजे आनंद आणि आदर्श शिंदे आणि अजय अतुल यांच्या स्वरमधुर आवाजाने या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढणार आहे. बाप्पाच्या लोकप्रिय गाण्यांचा आस्वाद या कार्यक्रमातून प्रेक्षकांना घेता येईल.

हेही वाचा: मातीचा गणपती कसा ओळखाल? वाचा भन्नाट टिप्स

सणासुदीचे दिवस म्हटले तर आपले पारंपरिक खेळही ओघाने आलेच. स्टार प्रवाहच्या मालिकांमधल्या तुमच्या आवडीच्या सासु-सुनांच्या जोड्या मंगळागौरीचे खास खेळ देखिल खेळणार आहेत. त्यामुळे मनोरंजनाने परिपूर्ण असा गणपती विशेष कार्यक्रम असेल. रविवारी १२ सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजल्यापासून प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घरबसल्या घेता येईल.

loading image
go to top