अजयचा नवा चित्रपट 'मैदान' रसिकांच्या भेटीला, प्रदर्शनाची तारीख जाहिर

ajay devgan news
ajay devgan news

मुंबई - प्रख्यात अभिनेता व दिग्दर्शक याचा मैदान नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यासंबंधीची अधिक माहिती त्यानं सोशल मीडियाव्दारे दिली आहे. अजयच्या या चित्रपटाविषयी ब-याच काळापासून प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता त्यानं त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करुन चाहत्यांना दिलासा दिला आहे.

बॉलीवूड अभिनेता अजय देवगणच्या मैदान नावाच्या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. तो कधी प्रदर्शित होणार यावरही वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज व्यक्त केले जात होते. आता मात्र खुद्द अजयनं त्याविषयीची अधिक माहिती दिली आहे. तो म्हणतो, पुढील वर्षी दस-याच्या शुभमुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपटट सैय्यद अब्दुल रहिम यांच्या आयुष्यावर आधारित आहे. ज्यात 1950 ते 1963 दरम्यान त्यांनी भारताच्या फुटबॉल संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. याशिवाय ते मॅनेजरही होते. त्यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे.

अब्दुल यांच्या भूमिकेत अब्दुल दिसणार आहे. त्याची तयारीही त्यानं सुरु केलं आहे. अजय म्हणाला, आता माझा मैदान नावाचा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित  होणार आहे. त्याच्या चित्रिकरणाला जानेवारीत सुरुवात होणार आहे. यावेळी अजयनं या चित्रपटाचं एक पोस्टरही शेयर केलं आहे. ते देखील चांगलेच चर्चेत आले आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण  लखनऊ, कोलकाता आणि मुंबई याठिकाणी होणार आहे. जानेवारी मध्ये त्याच्या शेड्युल्ड चे प्लॅनिंग फायनल होणार आहे. मात्र यावेळी कोरोनाची साथ तशीच राहिल्यास कदाचित त्याच्या प्रदर्शनाला उशीर होण्याची शक्यता आहे. आता जवळपास चित्रपटाचे 65 टक्के शुटिंग पूर्ण झाले आहे. दिग्दर्शकानं 2021 च्या एप्रिल मध्ये शुटींग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन बधाई हो चित्रपटाचे दिग्दर्शक अमित शर्मा करणार आहे. तसेच अजय देवगण बरोबरच अलावा प्रियामनी, गजराव राव आणि रुद्राणी घोष हे सहकलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com