Video : 'नऊवारी'तील काजोलबद्दल 'तानाजी' अजय म्हणाला, आम्हीतर...

टीम ईसकाळ
मंगळवार, 7 जानेवारी 2020

अजयने काजोलसोबत काम करून कसं वाटलं या प्रश्नावर विनोदी उत्तर दिले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अजय काजोलबद्दल असं काय विनोदी बोलला ज्याने सगळं वातावरणंच हास्यमय झालं... 

पुणे : 'तानाजी : द अनंसग वॉरियर' या चित्रपटाच्या निमित्ताने अजय देवगण आणि त्याची पत्नी आणि महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. यासंदर्भात पुण्यात झालेल्या एका संवादादरम्यान अजयने काजोलसोबत काम करून कसं वाटलं या प्रश्नावर विनोदी उत्तर दिले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अजय काजोलबद्दल असं काय विनोदी बोलला ज्याने सगळं वातावरणंच हास्यमय झालं... 

'Tanhaji :The Unsung Warrior' सिनेमा मराठी भाषेतही प्रदर्शित होणार!

Related image

Tanhaji Trailer : 'हर मराठा पागल है... स्वराज्य का, शिवाजीराजे का!'; तानाजीचा तुफान ट्रेलर रिलीज

तानाजी चित्रपटात अजय देवगण नरवीर तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत आहे, तर काजोल तानाजींच्या पत्नीच्या म्हणजेच सावित्रीबाई मालुसरेंच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे ही ऑफस्क्रीन पती-पत्नीची जोडी ऑनस्क्रीनही अभिनयात रंग भरताना दिसणार आहे. याचसंदर्भात अजयला काजोलसोबत इतक्या दिवसांनी काम करताना कसं वाटलं, अनुभव कसा होता असा सवाल केला असता अजयने भन्नाट विनोदी उत्तर दिलं. तो म्हणाला, 'तिच्यासोबत काम करताना असं वाटत होतं की घर आणि सेट एकच आहे. घरातून एकत्र निघालोय आणि सेटवर येऊन काम करतो.' त्याच्या या उत्तराने सगळेजण हसायला लागले. त्याचं हे उत्तरही साहाजिक होतं, कारण रोज नवरा-बायको म्हणून घरी एकत्र राहणं आणि पुन्हा सेटवरही पती-पत्नीची भूमिका साकारणं म्हणजे घरीच असल्यासारखं आहे, फक्त घरी न राहता सेटवर येऊन अभिनय करायचा. 

Tanhaji : 'तानाजी'च्या या 10 डायलॉग्जने लावलंय सगळ्यांना वेड!

अजय-काजोलने यापूर्वी 'इश्क', 'प्यार तो होना ही था', 'राजू चाचा', 'यु मी और हम' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. आता 'तानाजी : द अनंसग वॉरियर'मध्येही ते पती-पत्नीची भूमिका करत आहेत. त्यामुळे या जोडप्याची ऑनस्क्रीन केमिस्ट्री बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. 

'मैं आपको हारने नहीं दूंगी'; काजोल दिसणार मराठमोळ्या रूपात

Image result for ajay kajol

'अनसंग वॉरियर्स' मालिकेतील पहिली गोष्ट तानाजींची!
शिवाजी महाराजांसोबत जे मावळे लढले व ज्यांनी मराठा साम्राज्यासाठी आत्मसमर्पण केले, त्याग केला अशा अनेक लढवय्यांची देशाला ओळख करून देण्यासाठी 'अनसंग वॉरियर्स' ही मालिका मी सुरू केली आहे. तानाजींचाही इतिहासाच्या पुस्तकात एक छोटा उल्लेख असतो, मात्र त्यांच्याबद्दल व त्यांच्या शौर्याबद्दल देशाला माहिती नाही. आपलं दुर्दैव असं की तानाजींबद्दल माहिती ही फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित आहे. हीच माहिती सर्व देशासमोर आणण्यासाठी मी या चित्रपटाची निर्मिती केली. तसेच नरवीर तानाजी मालुसरेंचा पराक्रम सर्व देशाला माहिती व्हावा यासाठी मी हा चित्रपट हिंदीत काढतोय, असे अजय देवगणने सांगितले.

Tanhaji Promo : 'एक तरफ मुघलों की आँधी, दुसरी तरफ मुठ्ठीभर मराठा'

Image result for tanhaji poster

अशा साकारल्या सावित्रीबाई मालुसरे...
जेव्हा एखादा सरदार लढायला जातो, तेव्हा त्याच्या पत्नीचा व त्यांच्या मुलांचा त्यागही तितकाच मोठा असतो. हा माणून परत येईल की नाही याची खात्री नसताना ती त्याला हासून निरोप देते, दिव्याने ओवाळून सुखरूप या अशी प्रार्थना करते. अशी माहिती आम्हाला सावित्रीबाईंवर संशोधन करताना सापडली होती. याचा आधार घेत आम्ही सावित्रीबाई मालुसरेंची व्यक्तिरेखा साकारली, असेही अजयने यावेळी सांगितले.  

तानाजी चित्रपटामुळे 'ही' साडी चर्चेत

Related image

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तानाजी चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेल्या शरद केळकरने 'गड आला पण सिंह गेला' हा डायलॉग म्हणत प्रेक्षकांची मनं जिंकली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajay Devgan speaks about Kajol and his on screen chemistry in Tanhaji