अजय देवगण साकारणार तानाजी मालुसरे

टीम ई सकाळ
गुरुवार, 20 जुलै 2017

अजय देवगण अस्सल मराठमोळ्या भूमिकांमध्ये  लोकप्रिय झाला. त्याने वठवलेली सिंघमची भूमिकाही गाजली. आता बुधवारी रात्री सोशल मिडीयावर ट्विट करून त्याने नवी बातमी दिली. आता अजय तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. 

मुंबई : अजय देवगण अस्सल मराठमोळ्या भूमिकांमध्ये  लोकप्रिय झाला. त्याने वठवलेली सिंघमची भूमिकाही गाजली. आता बुधवारी रात्री सोशल मिडीयावर ट्विट करून त्याने नवी बातमी दिली. आता अजय तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. 

ट्विट करताना अजय देवगणने तानाजी यांचे भरभरून कौतुक केले आहे. तो त्याच्या माणसांसाठी, त्याच्या आत्म्यासाठी आणि त्याचे राजे छत्रपती शिवाजी यांच्यासाठी लढला असे म्हटले आहे. 

शिवाजी महाराजांचे विश्वासू साथीदार म्हणून तानाजी मालुसरे यांची ओळख आहे. कोंढाणा गड घेताना प्राणाची बाजी लावून तानाजी मालुसरे यांनी तो गड जिंकला. पण त्यासाठी त्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. याच घटनेवर बेतलेला तानाजी: अनसंग वाॅरिअर असे या सिनेमाचे नाव आहे. 

 

Web Title: Ajay devgan in Tanaji new movie esakal news