अजयचा 'तानाजी' ढाल घेऊन आला

वृत्तसंस्था
बुधवार, 2 जानेवारी 2019

अभिनेता अजय देवगणच्या 'तानाजी : द अनसंग वॉरिअर' चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण हा सिनेमा शिवरायांच्या स्वराज्याचे सेनापती तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलिज झाले आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊतने आपल्या ट्विटरवर हा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या फोटोत अजय देवगन हातात तलवार घेऊन शिवरायांच्या खऱ्या योद्ध्याप्रमाणे दिसत आहे. 

अजय देवगणबरोबर सैफ अली खान, काजोल, सुनील शेट्टी, पंकज त्रिपाठी हे कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत. सैफ अली खान औरंगजेबाची भूमिका साकारणार आहे. काजोल लक्ष्मीबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर सुनील शेट्टी मिर्झा राजा जय सिंह यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र सलमान खान शिवाज महाराजांनी भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. स्टारकास्टमुळे या चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता आहे.

शिवाजी महाराजांनी सिंहगड ताब्यात घेण्याचा विचार सानाजिंना सांगितला त्यावेळी तानाजींच्या मुलाचे लग्न ठरले होते. तानाजींच्या घरी लग्न असल्याने शिवाजी महाराज बेत बदलणार होते. मात्र तानाजींनी स्वतःहून या लढाईचं नेतृत्व आपल्याला देण्याची महाराजंना विनंती केली. यावेळी काढलेले ''आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे'' असे तानाजींचे उद्गगार प्रसिद्ध आहेत. या युद्धात तानाजी मालुसरेंनी बलिदान दिल्याचे शिवाजी महाराजांना समजले, तेव्हा त्यांनी 'गड आला पण सिंह गेला' असे गौरोवोद्गार काढले. त्यानंतर या गडाचे नाव कोंढाणावरुन 'सिंहगड' असे बदलण्यात आले.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajay devgan's tanaji movie first look