Ajay Devgn 'या' गोष्टीला जबरदस्त घाबरतो.. एका दुर्घटनेनं क्षणात बदललेलं अभिनेत्याचं आयुष्य..वाचा किस्सा Bhola Actor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajay Devgn

Ajay Devgn 'या' गोष्टीला जबरदस्त घाबरतो.. एका दुर्घटनेनं क्षणात बदललेलं अभिनेत्याचं आयुष्य..वाचा किस्सा

Ajay Devgn: अजय देवगणचा आगामी सिनेमा 'भोला'चा टीजर लॉंच झाला आहे. टीजरनं प्रेक्षकांमध्ये आता ट्रेलर विषयीची उत्सुकता वाढवली आहे. सिनेमात पुन्हा एकदा अजय देवगण आणि तब्बूची जोडी दिसणार आहे.

महाशिवरात्री दिवशी अभिनेत्यानं काही नवीन फोटो शेअर केले होते, जे सध्या चर्चेत आहेत. नेहमीच डॅशिंग भूमिका साकारणाऱ्याच्या अजयच्या चाहत्यांना त्याच्याविषयीची ही गोष्ट मात्र हैराण करून सोडेल.(Ajay Devgn Bhola actor elevator experience says i was in elevator when it droppped)

अजय देवगणनं कॉमेडी नाइट्समध्ये खुलासा केला होता की लिफ्टमधनं जाण्याऐवजी तो नेहमी बिल्डिंगचे जीने चढत जाणं पसंत करतो. अभिनेत्यानं खुलासा केला होता की एकदा तो ज्या लिफ्टमध्ये होता ती लिफ्ट चौथ्या मजल्यावरनं थेट बेसमेंटमध्ये जाऊन आदळली होती. दरवाजा उघडत नसल्याकारणानं तो लगेच बाहेर येऊ शकला नाही आणि तब्बल दीड तास लिफ्टच्या आत अडकला होता.

'दृश्यम' अभिनेत्यानं सांगितलं की त्यानंतर त्याला लिफ्टमध्ये क्लॉस्ट्रोफोबिकचा त्रास जाणवतो. त्यामुळे त्यानं लिफ्टमध्ये जाणंच बंद केलं आणि इमारतीचे जीने चढणं तो अधिक पसंत करतो.

व्हॅलेंटाईन डे दिवशी अजय देवगणनं एक छान फोटो पोस्ट केला होता आणि लिहिलं होतं की,''मला नाही माहिती की हे पहिल्या नजरेतलं प्रेम होतं की नाही. पण प्रवासात कुठेतरी हा कॅमेरा माझं पॅशन बनला. यंदाचा व्हॅलेंटाईन डे मी या कॅमेऱ्यालाच डेडिकेट करतो''.

अजय देवगणच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर 'भोला' हा 'कैथी' या तामिळ सिनेमाचा ऑफिशियल हिंदी रीमेक आहे. हा सिनेमा तामिळ मध्ये ब्लॉकबस्टर ठरला होता.

अजय व्यतिरिक्त या सिनेमात तब्बू,दीप डोबरियाल, संजय मिश्रा आणि गजराज राव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा ३० मार्च रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.