esakal | सिंघमनं साजरा केला 'बॉडीगार्डचा बर्थ डे', फोटो व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

ajay devgn

सिंघमनं साजरा केला 'बॉडीगार्डचा बर्थ डे', फोटो व्हायरल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूड अभिनेता अजय देवगण (bollywood actor ajay devgn) हा त्याच्या दिलदार स्वभावासाठी प्रख्यात आहे. तो मदतशील अभिनेता आहे. काही वर्षांपासून अजयची बॉलीवूडमधील क्रेझ वाढत चालली आहे. त्याला मोठं यश मिळालं आहे. त्याच्या तान्हाजी नावाच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला होता. तान्हाजी (tanhaji the unsung warrior) सुपरहिट झाला. अजयचे आगामी काळात दोन ते तीन चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. त्यापैकी एका चित्रपटाचे तो दिग्दर्शनही करणार आहे. सध्या तो सोशल मीडियावर चर्चेत आहे त्याचे कारण त्यानं आपल्या बॉडीगार्ड़चा साजरा केलेला जन्मदिवस. (ajay devgn celebrated bodyguard birthday white beard look goes viral)

सिंघम (singham) चित्रपटापासून अजयनं मागे वळून पाहिलेलं नाही. तो त्याच्या करिअरला वेगळं वळण देणारा चित्रपट होता असं म्हटल्यास वावगं ठरु नये. अजयचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तो नेहमी आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. अजय आपल्या जवळच्या माणसांशी आपुलकीनं वागत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्यानं बॉडीगार्डचा जन्मदिवस साजरा करुन त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. विशेष म्हणजे त्या फोटोमध्ये अजयचा लूक चक्रावून टाकणारा आहे.

सध्या अजयचा सोशल मीडियावरील लूक चर्चेत आहे. त्यानं ब्लॅक रंगाचे टी शर्ट घातले आहे. त्याच्या पांढऱ्या रंगाच्या दाढीवर ब्लॅक कलरचा गॉगल आणखी वेगळा दिसतो आहे. तो त्याच्या या कुल लूकमध्ये चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अजयचे हे फोटो त्याचा बॉड़ीगार्ड यानं आपल्या सोशल मीडियावर शेयर केले आहेत. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. बॉडीगार्डनं ते फोटो शेयर करताना त्याला कॅप्शन दिली आहे. त्यानं लिहिलं आहे की, बॉसबरोबर आजचा जन्मदिवस साजरा केला आहे. त्याचा आनंद आहे. आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळेच आहे. माझा आजचा दिवस संस्मरणीय केल्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद.

हेही वाचा: #CannesFilmFestival : मराठमोळ्या उषा जाधवचा जलवा

हेही वाचा: 'द काश्मीर फाइल्स'च्या लाइन प्रोड्युसरची आत्महत्या; अनुपम खेर हळहळले

अजयच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचं झाल्यास, तो भुज द प्राईस ऑफ इंडिया मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यात त्याच्या जोडीला नोरा फतेही आणि सोनाक्षी सिन्हाही आहे. याशिवाय आरआरआर या दाक्षिणात्य सिनेमातही अजय चमकणार आहे. दुसरीकडे मे डे नावाच्या चित्रपटातून तो दिग्दर्शनात पदार्पणही करणार आहे.

loading image