Kajol Daughter: सिंघमच्या मुलीला आला राग, नेटकरीही चिडले!

अजय देवगण आणि काजोल हे प्रसिद्धीपासून लांब राहणारं कपल आहे. हे अनेकांना माहिती आहे.
Nyasa Devgn
Nyasa Devgnesakal

Ajay Devgn- अजय देवगण आणि काजोल हे प्रसिद्धीपासून लांब राहणारं कपल आहे. हे अनेकांना माहिती आहे. मात्र त्यांची मुलगी न्यासा हिला (bollywood news) लाईमलाईट मध्ये राहण्याची भारी हौस आहे. तिचा ग्लॅमरस लूक सध्या चर्चेत आला आहे. तसेच तिनं फोटोग्राफर्सला (entertainment news) सुनावल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. निसा तिच्या मैत्रीणीसमवेत हॉटेलिंग करण्यासाठी गेली होती. त्यावेळी (bollywood celebrity) तिला काही फोटोग्राफर्सनं हटकलं. त्यांना तिनं चांगरलचं सुनावलं आहे. त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होते आहे.

न्यासाच्या त्या व्हिडिओमध्ये खुशी कपूर आणि शनाया कपूर दिसत आहेत. या तिघीजणी स्टार किड असल्यानं त्यांच्या नावाची मोठी चर्चा आहे. यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर शेयर केलेल्या फोटोनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या तिघीजणी एका हॉटेलमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी निसाला काही फोटोग्राफर्सनं आवाज दिला. तेव्हा भड़कलेल्या निसानं फोटोग्राफर्सला खडसावलं. तो व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रागानं निसा गाडीत बसून निघून गेली आहे. तिचा तो अंदाज नेटकऱ्यांना आवडलेला नाही.

Nyasa Devgn
कल्याण VIRAL VIDEO : प्रेमाचा संशय, कारचालकाने नेले तरुणाला फरफटत

तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर न्यासाला नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. तिच्यावर टीकाही केली आहे. एकानं लिहिलं आहे की, सध्या ज्या कुणी नव्या अभिनेत्री येत आहेत त्यांच्यामागे आई वडिलांची पुण्याई आहे. अभिनयाचा गंधही नसलेल्या या अभिनेत्रींमध्ये कमालीचा अहंकार आहे. अभिनयापेक्षा सोशल मीडियावर रिल्स करण्यावर अधिक भर असतो. त्यांचा अॅटीट्युट तर कमालीचा आहे. अशाप्रकारे नेटकऱ्यांनी न्यासाला ट्रोल केले आहे. तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून निसा चर्चेत आली आहे. अजून तिनं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी आगामी काळात ती डेब्यु करणार असल्याचे बोलले जाते.

Nyasa Devgn
Photo Viral: दिया मिर्झा पहिल्यांदाच दिसली छोट्या 'अव्यान' सोबत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com