सिनेमा रिलीजच्या एक दिवस आधी रात्री अजय देवगण हटकून करतो 'ही' गोष्ट..म्हणाला..Ajay Devgn | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajay Devgn

Ajay Devgn: सिनेमा रिलीजच्या एक दिवस आधी रात्री अजय देवगण हटकून करतो 'ही' गोष्ट..म्हणाला..

Ajay Devgn: बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचा 'भोला' हा सिनेमा रिलीज झाला आहे. सिनेमात अजय देवगणसोबत तब्बू,दीप डोबरियाल,संजय मिश्रा,गजराज राव यांच्या महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आहेत. अजय देवगणनं देखील सिनेमाचं भरपूर प्रमोशन केलं आहे.

रिलीजच्या एक दिवस आधी रात्री त्यानं ट्वीटरवर #ASKBholaaसेशन देखील ठेवलं होतं. या सेशन दरम्यान अजय देवगणनं चाहत्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.

चला जाणून घेऊया त्या इंट्रेस्टिंग गप्पांविषयी..अगदी प्रश्न आणि उत्तरं सविस्तरपणे जाणून घेऊयात.(Ajay Devgn reaction in twittersession open secrets bholaa movie actor)

ट्वीट- भोला दिग्दर्शित करताना किती वेळ लागला?

अजय देवगणचं -खूप वेळ लागला.

ट्वीट- तू नेहमीच तुझ्या सिनेमाविषयी खूप सकारात्नक आणि खूश दिसतोस? तुला कसं जमतं?

अजय देवगण- कोणताही माणूस नेहमीच सकारात्मक राहूच शकत नाही..आपण फक्त तसं राहण्याचा प्रयत्न करू शकतो.

ट्वीट-आम्ही ऐकलंय की अभिषेक बच्चनही 'भोला' सिनेमाचा भाग आहे? कॅमियो की मग मास सरप्राइज?

अजय देवगण -सरप्राइज सांगतात का?

ट्वीट- सर..प्लेन उडवायला मज्जा येते की बाइक पळवायला?

अजय देवगण -लोकांना उडवायला मजा येते..

ट्वीट- प्रश्न काहीही विचारले जातायत...

अजय देवगण - मी पूर्णपणे सहमत आहे याच्याशी

ट्वीट-भोला तुझा सर्वात बेस्ट सिनेमा म्हणता येईल का?

अजय देवगण - रामनवमीला सिनेमा पहा आणि तुम्हीच ठरवा

ट्वीट-भोला रिटर्न पण येणार का?

अजय देवगण-आधी भोला पाहून रिटर्न ये...

ट्वीट-सिनेमा रिलीजच्या एक दिवस आधी तू काय करतोस?

अजय देवगण- हेच करतो ..जे मी आता याक्षणी करत आहे. तुमच्यासारख्या चाहत्यांशी गप्पा..

ट्वीट-आज रात्री तुला झोप येईल का?आम्हालाही परिक्षेच्या एक दिवस आधी झोप येत नाही.

अजय देवगण-परिक्षेचं फिलिंग नाही..सध्या निकालाचं फिलिंग आहे..

ट्वीट-तिकिट स्पॉन्सर करशील का? महिन्याचे शेवटचे दिवस आहेत

अजय देवगण उत्तर-माझे देखील..

अजय देवगणनं 'भोला' सिनेमाच्या रिलीज आधी चाहत्यांशी मनमोकळा संवाद साधला हे यामधून समोर आलंच आहे. सिनेमा रिलीज झाल्यावरही 'भोला' विषय़ी चांगल्या प्रतिक्रिया प्रेक्षक देताना दिसत आहेत.

सिनेमा एकदा पहायलाच हवा असं देखील लोक म्हणत आहेत. त्यात अजय आणि तब्बूच्या जोडीनं मोठ्या पडद्यावर चांगले हिट सिनेमे दिल्यानं 'भोला'मध्ये पुन्हा त्यांना एकत्र पाहणं त्यांच्या चाहत्यांसाठी ट्रीट असेल. अजयच्या मसालेदार अॅक्शन्स तसंही नेहमीच चाहत्यांना थ्रील अनुभवण्यास देतात.