'अनेकदा मी माझ्या मुलीला सांगतो..', नीसाच्या ट्रोलिंगवर अभिनेता अजय देवगण नाही तर एक 'बाप' उत्तर देत होताAjay Devgn & Nysa Devgn | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajay Devgn & Nysa Devgn

Ajay Devgn: 'अनेकदा मी माझ्या मुलीला सांगतो..', नीसाच्या ट्रोलिंगवर अभिनेता अजय देवगण नाही तर एक 'बाप' उत्तर देत होता

Ajay Devgn: बॉलीवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याचा आगामी सिनेमा 'भोला'च्या प्रमोशन मध्ये प्रचंड बिझी आहे. नुकतंच त्यानं एका मुलाखती दरम्यान आपली मुलगी न्यासा हिच्या विरोधात सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या कमेंट्स संदर्भात बातचीत केली. चला जाणून घेऊया न्यासाच्या ट्रोलिंगवर काय म्हणाला अजय देवगण?

नुकतंच फिल्मफेअर मॅगझीनसोबतच्या मुलाखतीत अजय देवगणला विचारलं गेलं की, 'आपली मुलं युग आणि न्यासाला कोणत्याही न्यूजच्या माध्यमातून स्पॉटलाइटमध्ये आणलं जातं..तेव्हा तो त्या गोष्टींशी डील कसं करतो? '

त्यावर अजय देवगण म्हणाला,''मी नीसाला कायम सांगतो की सोशल मीडियावर जे तुमच्याविषयी लिहिलेलं वाचता त्याचं टेन्शन घेऊ नका. आम्हाला कळत नाही लोकांमध्ये इतकी नकारात्मकता येते कुठून''. (Ajay Devgn reaction on his daughter nysa devgn gettig trolled on social media)

अजय देवगण पुढे म्हणाला,'' मी या ट्रोल्सकडे दुर्लक्ष करायला शिकलो आहे आणि आता मी माझ्या मुलांना देखील हेच सांगतो. कधी कधी मला हेच कळत नाही की नेमकं लोकांनी काय लिहिलं आहे..त्याला काही अर्थच नसतो. आणि मग मी देखील या गोष्टींनी त्रस्त होत नाही''.

अजयनं त्यानंतर नीसा देवगणला सोशल मीडियावर जे ट्रोल केलं जातं त्याविषयी देखील बातचीत केली.

त्यानं सांगितलं की, ''या गोष्टी मला खूप टेन्शन देतात. पण मी हे बदलू शकत नाही. तुम्हाला खरंच कळत नाही की अशावेळेला काय करावं. कधी कधी काही गोष्टी समजण्या पलिकडे असतात. काही गोष्टी तर अशा लिहिलेल्या असतात की ज्यांच्याविषयी आपण विचारही करू शकत नाही. पण जर तुम्ही त्यावर रिअॅक्ट होता तर त्यांचं उगाचच भांडवल केलं जातं. खूप ट्रिकी सिच्युएशन असते ती''.

हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

युग आणि नीसाच्या बॉलीवूड पदार्पणाविषयी तसंच बॉलीवूडच्या त्यांच्या आवडी-निवडीविषयी देखील अजय बोलला.

तो म्हणाला,''माझा मुलगा युग आमचे सिनेमे आता कुठे जाऊन पाहू लागलाय. पण नीसा बॉलीवूडचे सिनेमे पाहत नाही. म्हणजे आतापर्यंत तरी तिनं हे सिनेमे पाहिलेले नाहीत''.

नीसानं आपलं शालेय शिक्षण मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेतून पूर्ण केलं आहे. यानंतर पुढचं शिक्षण तिनं सिंगापूरच्या युनायटेड कॉलेज ऑफ साऊथईस्ट एशिया मधनं पूर्ण केलं आहे. सध्या नीसा स्वित्झर्लंड मध्ये आपलं पुढचं शिक्षण घेत आहे.