'भारताविरुद्ध होणाऱ्या चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका'; अजय आणि अक्षयची भारतीयांना विनंती

Akshay and Ajay
Akshay and Ajay

भारतात राजधान दिल्लीच्या सीमेवर होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूड कलाकारांपासून ते जगप्रसिद्ध पॉपस्टारसुद्धा या आंदोलनावर व्यक्त होऊ लागले आहेत. अशातच बॉलिवूडचा 'सिंघम' अर्थात अभिनेता अजय देवगण याने भारतीयांना एक विनंती केली आहे. अजयने ट्विट करत भारतीयांना एकत्र राहण्याचं आवाहन केलं आहे.

'भारत किंवा भारतीय धोरणांविरुद्ध केल्या जाणाऱ्या कोणत्याही चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका. सध्याच्या घडीला कोणताही वाद न करता, भांडण न करता एकत्रित राहणं सर्वांत गरजेचं आहे,' असं ट्विट अजयने केलंय. तर दुसरीकडे अक्षय कुमारनेही आंदोलनाबाबत ट्विट केलं आहे. 'शेतकरी हा आपल्या देशाचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे आणि त्यांच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र मतभेद निर्माण करणाऱ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा सौहार्दपूर्ण निर्णयाला पाठिंबा देऊयात,' असं लिहित अक्षयनेही भारतीयांना आवाहन केलं.

सुप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेतकऱ्यांच्या आंदोलनावर ट्विट केलं. त्याचसोबत स्वीडीश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनेसुद्धा शेतकरी आंदोलनाचं समर्थन केलं. त्यामुळे सोशल मीडियावर यावर मत मांडणाऱ्यांचे दोन गट तयार झाले आहेत. या वादात अभिनेत्री कंगना राणावतनेही उडी घेतली आहे. 'तू गप्प राहा मूर्ख मुली, आंदोलन करणारे हे शेतकरी नाहीत तर दहशतवादी आहेत,' अशी टीका कंगनाने रिहानाला उत्तर देताना केली.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com