Prashant Damle: नाट्यपरिषदेच्या दमदार विजयानंतर प्रशांत दामले यांची शिंदे-पवार भेट.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akhil bharatiya marathi natya parishad newly elected president prashant damle meets sharad pawar and cm eknath shinde

Prashant Damle: नाट्यपरिषदेच्या दमदार विजयानंतर प्रशांत दामले यांची शिंदे-पवार भेट..

Prashant Damle: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत प्रशांत दामले यांचे 'रंगकर्मी नाटक समूह' विजयी झाल्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही प्रशांत दामले यांनी बाजी मारली. 16 मे रोजी ही अध्यक्ष पद आणि कार्यकारिणीची बैठक पार पडली. यामध्ये प्रशांत दामले हे प्रचंड बहुमताने अध्यक्ष म्हणून विजयी झाले.

प्रशांत दामले यांनी (प्रसाद ) नवनाथ कांबळी यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. तयानंतर कार्यकारिणी देखील ठरवण्यात आली. या सर्व कार्यकारिणीला घेऊन प्रशांत दामले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

(akhil bharatiya marathi natya parishad newly elected president prashant damle meets sharad pawar and cm eknath shinde)

यावेळी दामले यांच्यासोबत नाट्यपरिषदेचे नवनिर्वाचित कार्यवाह अजित भुरे आणि इतर कार्यकारिणीचे सदस्यदेखील उपस्थित होते. या भेटी दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दामले यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

विशेष म्हणजे दामले यांनी निवडूक आल्या आल्याच सरकारचे कौतुक केले होते ''आताचं सरकार हे ऐकणारं सरकार आहे.. त्यामुळे कामं मार्गी लागतील.'' असं दामले म्हणाले होते. त्यामुळे ही भेट विशेष ठरली.  

तयानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची देखील प्रशांत दामले आणि त्यांच्या कार्यकारिणीने भेट घेतली. शरद पवार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी स्वतः या भेटीचे फोटो पोस्ट करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी अध्यक्ष- प्रशांत दामले , सहकार्यवाह- समीर इंदुलकर, दिलीप कोरके, सुनील ढगे, उपाध्यक्ष - नरेश गडेकर, उपाध्यक्ष उपक्रम- भाऊसाहेब भोईर, खजिनदार- सतीश लोटके यासह सुशांत शेलार, सविता मालपेकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :prashant damle